राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख बलात्कार प्रकरणात पीडित तरुणीचा नवा खुलासा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर  अत्याचाराचा गुन्हा दाखल करणाऱ्या पीडितेने केलेल्या नव्या खुलाश्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. (New revelation of victim in Mahebub Shaikh rape case)

भाजपचे आमदार सुरेश धस आणि भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांच्याविरोधात अत्याचाराची खोटी तक्रार दाखल केल्याचा गंभीर आरोप फिर्यादी तरुणीने केला आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात आता  खळबळ उडाली आहे. (False charges were filed against Mahebub Shaikh at the behest of MLAs Suresh Dhas and Chitra Wagh)

या प्रकरणातील पीडित तरुणीने औरंगाबाद मधील जिंसी पोलीस ठाण्यामध्ये आमदार सुरेश धस आणि चित्रा वाघ तसेच मालेगावमधील माजी नगरसेवक नदमोद्दीन शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या ?

दरम्यान या सर्व आरोपांवर चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी बोलताना वाघ म्हणाल्या कि, राजकारणात काम करताना अशा घटना आणि अनुभव नवीन नाहीत आम्ही त्या मुलीला पहिल्या दिवसापासून मदतच केली आहे, त्यामुळे आम्ही कुठल्याही चौकशीला तयार आहोत, तपास यंत्रणांना मदत करायला तयार आहोत असेही वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले.

पीडित तरुणीचे घुमजाव

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप करत 28 डिसेंबर 2020 रोजी औरंगाबादच्या सिडको पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी एका तरुणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हे प्रकरण उचलून धरत तरुणीला मदत केली होती.

परंतु आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे या प्रकरणातील पीडित तरुणीने भाजप आमदार सुरेश धस आणि चित्रा वाघ यांनी महबूब शेख यांच्याविरोधात खोटी तक्रार देण्यास भाग पाडले असा आरोप केला आहे.

चित्रा वाघ यांनी मीडियाशी कसं बोलायचं आणि सुरेश धस यांनी जे लिहून दिलं ते मीडियासमोर बोलायला सांगितलं असाही आरोप या तरुणीने केला आहे  एकूणच या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याने पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या सामना रंगताना दिसणार आहे.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख काय म्हणाले ?

दरम्यान या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांची प्रतिक्रिया समोर आले आहे यावेळी बोलताना शेख म्हणाले की उसके घर देर है मगर अंधेर नही, सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही अशा मोजक्या शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.