मोठी बातमी : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेणार ? राज ठाकरेंच्या पत्रानंतर फडणवीसांचे संकेत

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यात रोज नव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना विरूध्द शिंदे गट हा वाद अजून शमलेला नाही. आता अंधेरी पोटनिवडणुकीला नवे वळण लागले आहे. या निवडणुकीतून भाजप माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेण्याचे संकेत दिले आहेत.

Big news, will BJP withdraw from Andheri by-election?, Fadnavis hints after Raj Thackeray's letter, BJP latest news,

आमच्या उमेदवाराला समर्थन मिळावे म्हणून आशिष शेलार यांनी आज राज्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राज्य ठाकरे यांनी भाजपने ही निवडणूक लढवू नये अशी इच्छा व्यक्त करत तसे पत्र दिले आहे. असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापूर्वीही अनेकदा योग्य पध्दतीने मागणी आल्यास योग्य निर्णय झाले आहेत. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगत फडणवीस यांनी माघारीचे संकेत दिले आहेत.

फडणवीस पुढे म्हणाले की, आम्ही उमेदवार दिला आहे. राज ठाकरे यांच्या पत्रावर विचार करायचा झाला तर एकट्याला करता येणार नाही. सर्वांशी बोलून निर्णय घ्यावा लागेल. बाळासाहेबांची शिवसेना पण आमच्या सोबत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विचारावं लागेल. पक्षातील माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. चर्चेअंती कुठलाही निर्णय घेतला जाईल.

शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी स्वागत केले आहे. पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचा पायंडा भाजपने पाळावा असे अवाहन राऊत यांनी केले.

राज ठाकरे यांच्या पत्रात काय ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंधेरी पोटनिवडणूक संदर्भात पत्र लिहले आहे. यात म्हटले आहे की, दिवंगत आमदार रमेश लटके हे एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासुन सुरु झालेल्या त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होणं ही कैलासवासी रमेश लटके यांच्या आत्मास खरोखर शांती मिळेल.

माझी विनंती आहे की , भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये. आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्या आमदार होतील हे पहावं अशी विनंती राज ठाकरे यांनी फडणवीस यांना पत्रातून केली आहे.

मी आमच्या पक्षातर्फे परिस्थितीत दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे, आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.