नावे ठेवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून पुढे चालत रहा, नक्कीच प्रगती होईल – अजिनाथ हजारे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा ।  सामजिक , आर्थिक राजकिय क्षेत्रामध्ये कार्य करत असताना विविध संकटांना सामोरे जावे लागते. सामाजिक संघटना चालवत असताना तर खूप त्रास होतो. आपण आपले कार्य करत असताना नावे ठेवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून पुढे चालत रहा, तुमची नक्की प्रगती होईल असे प्रतिपादन ज्योती क्रांती मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन अजिनाथ हजारे यांनी केले.

Ignore name callers, keep moving forward, progress will surely come - Ajinath Hazare

सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येत असलेल्या संपर्क अभियानांतर्गत अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीची बैठक हॉटेल राज पॅलेस येथे संपन्न झाली.प्रदेश महासचिव मयुर वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी हजारे बोलत होते.

Ignore name callers, keep moving forward, progress will surely come - Ajinath Hazare

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रविण गाडेकर,प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मनिषाताई सोनमाळी,प्रदेश प्रवक्ते डॉ राजीव काळे, प्रदेश सचिव बापुराव धोंडे, मराठवाडा अध्यक्ष इंजि.शिवानंद झोरे, मराठवाडा संपर्क प्रमुख विष्णूपंत खेञे, जिल्हा संपर्कप्रमुख संतोष मोहोळकर, जिल्हाध्यक्ष निखिल शेलार, जिल्हा कार्याध्यक्ष सावता हिरवे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ignore name callers, keep moving forward, progress will surely come - Ajinath Hazare

बैठकीच्या सुरुवातीला संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. आभार जिल्हाध्यक्ष निखिल शेलार यांनी मानले.

Ignore name callers, keep moving forward, progress will surely come - Ajinath Hazare