मोठी बातमी : पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उडवला भाजपचा धुव्वा, नागपूर जिल्ह्यात भाजपच्या हाती भोपळा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील सत्ताधारी भाजपची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला आहे. नागपूर जिल्हा पंचायत समिती निवडणुकीत भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

नागपूर जिल्ह्यातील 13 पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 10 जागा जिंकत मोठी बाजी मारली आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादीने 3 जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या ताब्यातील दोन पंचायत समित्याही विरोधकांच्या ताब्यात गेल्या. त्यामुळे या निवडणुकीत भाजपची पाटी मात्र कोरी राहिली.
काँग्रेसने रामटेक, नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, पारशिवानी, उमरेड, मौदा, कुही व भिवापूर, मौदा या पंचायत समितीत विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीनेने नरखेड, काटोल व हिंगणा येथे सत्ता स्थापन केली आहे. कुही आणि कामठी पंचायत समिती भाजपच्या ताब्यात होत्या तेथेही भाजपचा पराभव झाला.
एकुणच नागपूर जिल्ह्यात भाजपच्या हाती भोपळा आला आहे. नागपूर जिल्ह्यातील भाजपची दयनीय अवस्था झाल्याने हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.