Viral video news : वाचवा रे वाचवा…मला वाचवा… ड्रायव्हर मला किडनॅप करतोय.. प्रवाश्याने ठोकली बोंब…सोशल मिडीयावर व्हिडिओ तुफान व्हायरल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Viral video news। एक प्रवासी बसमधून वाचवा रे वाचवा… मला वाचवा.. ड्रायव्हर मला किडनॅप करतोय.. मला वाचवा.. अश्या बोंबा ठोकत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे. पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातून ही घटना समोर आली आहे. नेमकं त्या प्रवाश्याने अशी बोंब का ठोकली ? चला तर मग जाणून घेऊयात!

Save Me Save Me Driver Kidnaps Me Passenger traveler's screams, Video Storm Viral On Social Media, pune viral video news,

पुणे महानगर परिवहन मंडळ अर्थात पीएमपीएल (PMPL) बस चालक आणि प्रवाशाच्या भांडणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. (Pune Viral Video news)

व्हिडियोमध्ये एक तरुण मला माझ्या ऑफिस समोर सोडा म्हणून ड्रायव्हर केबिनमध्ये जोरा – जोरात आरडाओरडा करत आहे. बस थांबा निघून गेल्यानंतर प्रवाशाने बस थांबवण्यासाठी सांगितली. त्याला उतरण्यासाठी ड्रायव्हरने नकार दिल्यानंतर या तरूणाने मोठ्याने बोंब ठोकायला सुरूवात केली. एवढंच नाही तर प्रवाशाने अरेरावी केली. त्यामुळे बस चालकाने बसचे दार लॉक केले.

या प्रवाशाला उतरता आले नाही म्हणून प्रवाशाने चक्क बोंब मारत वाचवा रे वाचवा… मला वाचवा….ड्रायव्हर मला किडनॅप करत आहे… अशा प्रकारचा आरडाओरडा करताना हा तरुण या व्हिडिओमध्ये दिसत आहे. चिंचवड वरून बालेवाडी कडे जाणाऱ्या बस मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे.

व्हायरल होत असेलला हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. फक्त बसमधून उतरवण्यास मनाई केल्यामुळे या तरुणाने बसमध्येच अरोडाओरड सुरु केली. हा व्हिडिओ सध्या प्रचंड शेअर केला जात आहे.