पेट्रोल डिझेलची दरवाढ सुसाट : पाच दिवसांत 3 रूपये 20 पैश्यांची दरवाढ

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. शनिवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. (Petrol diesel price hike by Rs 3, 20 paise in last five days)

आठवडाभरात चौथ्यांदा ही दरवाढ झाली आहे. आज 80 पैश्यांनी दरवाढ झाली आहे. पाच दिवसांत 3 रूपये 20 पैश्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

पाच राज्यातील निवडणूकानंतर पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता तो आता खरा ठरत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

आज झालेल्या दरवाढीनुसार पेट्रोल प्रतिलिटर 114 च्या आसपास पोहचले आहे. तर डिझेल 97 रूपयांवर पोहचले आहे.

येत्या काही दिवसांत डिझेल शतक झळकावेल असा अंदाज आहे. महागाईने जनता होरपळून निघाली आहे. इंधन दरवाढीवर जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.