India vs South Africa T20 2022 live । आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टि 20 सामना

India vs South Africa T20 2022 live । दिल्ली येथील अरुण जेटली क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला t-20 सामना आज होणार आहे. (IND vs SA 1st T20 Match)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्याचे कर्णधारपद ऋषभ पंत यांच्याकडे असणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी सात वाजता सुरू होणार असून साडे सहा वाजता या सामन्याची नाणेफेक होणार आहे.

दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट मैदानाची (Arun Jaitley Cricket Stadium Delhi) खेळपट्टी धीम्या गतीची आहे.सीमारेषा दूर असल्याने तसेच आउट फील्ड गतिमान असल्याने या मैदानावर मोठी धावसंख्या होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीस मैदानात उतरू शकतो. यातून मोठी धावसंख्या उभारून प्रतिस्पर्धी संघाला समोर मोठे आव्हान यामुळे निर्माण होऊ शकते.

भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये आतापर्यंत 15 टी-20 सामने झाले आहे. त्यामध्ये 9 सामन्यांमध्ये भारताने बाजी मारलेली आहे. भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड ठरलेले आहे. भारतात खेळल्या चार सामन्यांत पैकी दक्षिण दक्षिण आफ्रिकेने तीन सामने जिंकलेले आहेत.

टी ट्वेंटी मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ खालील प्रमाणे (ind vs sa t20 squad 2022 players list india)

ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत(यष्टीरक्षक कर्णधार), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, केएल राहुल,

टी ट्वेंटी मालिकेसाठी निवडलेला दक्षिण आफ्रिका संघ खालील प्रमाणे (ind vs sa t20 squad 2022 players list South Africa)

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी निगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ट्रिसन स्टब्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, मार्को जॅन्सन,