मान्सूनसंबंधी पुणे वेधशाळेने जारी केली मोठी अपडेट ! महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? वाचा सविस्तर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने राज्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र आता मान्सून संदर्भात हवामान विभागाकडून नवीन अपडेट देण्यात आली आहे. (When will the monsoon start in Maharashtra? New update released by Pune Observatory)

येत्या 48 तासांमध्ये मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ के.एस होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांतमध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग,कर्नाटक आणखी काही भाग, TN चा उरलेला भाग, दक्षिण AP चा काही भाग, WC & NW BoB च्या आणखी काही भागात मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे. त्यापुढील 2 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल असे म्हटले आहे.