SRH vs MI : हैदराबादने उभारली IPLच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या, ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरीक क्लासेन, एडन मारक्रम यांनी मुंबईच्या गोलंदाजांच्या केल्या चिंधड्या !

हैदराबाद विरुद्ध मुंबई आयपीएल मॅच 2024 लाईव्ह : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या हैदराबादने मुंबई विरुद्ध आज उभारली.यंदाच्या आयपीएल मोसमातील हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना राजीव गांधी स्टेडियमवर खेळला जात आहे. हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडत सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे.हैदराबादकडून ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरीक क्लासेन , एडन मारक्रम या चौघा फलंदाजांनी विस्फोट फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजांच्या अक्षरश: चिंधड्या केल्या.हैदराबादने मुंबई विरुद्ध 277 धावा केल्या. हैदराबादकडून अभिषेक शर्माने विस्फोट खेळी करत अवघ्या 16 चेंडूत त्याने अर्धशतक झळकावले. हेनरीक क्लासेन याने सर्वाधिक 80 धावा केल्या.

Dhu Dhu Dhutla, Hyderabad set up the highest total in IPL history today, Travis Head, Abhishek Sharma, Henrik Klaassen, Aiden Markram ragged Mumbai bowlers, Hyderabad vs Mumbai ipl 2024 latest update,