Maharashtra Corona Guidelines | कोरोना निर्बंध हटवले, राज्य सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन नियमावली

जामखेड टाईम्स वृत्तसेवा। maharashtra Corona Guidelines | महाराष्ट्रात कोरोना वाढता उद्रेक लक्षात घेता लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये आता काहीशी सुट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या घटू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे.

एक फेब्रुवारीपासून नवीन नियमावली (Maharashtra Corona Guidelines) राज्यात लागू होणार आहे. अपेक्षेनुसार, निर्बंधामध्ये सूट देण्यात आली आहे. पण सूट देण्यात आलेल्या ठिकाणी जायचे असल्यास लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.

ओमिक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. यासंबंधी सरकारने सोमवारी मध्यरात्री नवी नियमावली जारी केली आहे.

नवीन नियमावली खालील प्रमाणे (Maharashtra Corona Guidelines)

  1. मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  2. लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी क्षमतेपेक्षा 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  3. अंत्यसंस्काराठी 20 व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून आता कितीही लोकांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहता येईल.
  4. अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  5. उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने सुरू करता येतील.
  6. मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 लोकांना प्रवेश देण्यात आला आहे.
  7. नॅशनल पार्क आणि जंगल सफारी आधीप्रमाणे नियमीत वेळवर सुरु होतील. येथे भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. तसेच मास्कही वापरण्यात यावा. दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकिट बूक करावे लागेल.
  8. सर्व पर्यटनस्थळे नियमीत वेळेवर सुरु होतील. ऑनलाईन तिकिट खरेदी करावे लागेल. तसेच पर्यटनस्थळावर फिरायला जाणाऱ्याचे लसीकरण झालेलं असावे.
  9. स्पा, ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये 50 टक्के उपस्थिती असावी.