AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना अटक

उत्तर प्रदेश  : देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक घटना उत्तर प्रदेशमधून (uttar pradesh election 2022) समोर आली आहे. एमआयएम पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार बॅ असदुद्दीन ओवीसी (MP Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर गोळीबार (Owesi’s car fireing) करण्यात आला आहे. नशीब बलवत्तर म्हणून ओवीसी हे या प्राणघातक हल्ल्यातून बचावले. या हल्ल्याचा व्हिडीओ (Video) आता समोर आला आहे. त्यातच आता या प्रकरणातील दोघा हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (Uttar Pradesh Assembly Elections) कार्यक्रम आटोपून दिल्लीला निघालेले AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. हल्लेखोरांनी ओवीसी यांच्या गाडीवर तीन-चार राऊंड फायर केले. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनीच ट्वीट करून गाडीवर गोळीबार झाल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एमआयएमच्या मुंबईच्या सेक्रेटरी झोहरा खान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज शेअर केलं आहे.

या व्हिडीओमध्ये एक लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला व्यक्ती टोल नाक्यावरुन जात असलेल्या ओवेसी यांच्या गाडीकडे धावत जाताना दिसत आहे. तसंच या व्हिडीओमध्ये हल्लेखोर त्यांच्या गाडीवर फायरिंग करुन पळण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत दिसत आहे. परंतु त्यातला एक हल्लेखोर गाडीवर आदळून खाली पडताना दिसतोय. यादरम्यान एक हल्लेखोर आपल्या हातात बंदूक घेऊन फायरिंग करतानाही दिसत आहे. दरम्यान, यानंतर हापुडचे एसपी दीपक भुकर यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश हापुड जिल्ह्यात असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर फायरिंग केल्याच्या घटनेच्या तपासाबाबत प्रदेशाचे एडीजी (लॉ अँड ऑर्डर) प्रशांत कुमार यांनी माहिती दिली. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.. मेरठचे आयजी या प्रकरणावर स्वत: लक्ष ठेवून होते. पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांना पकडण्यात मेरठ पोलिसांना यश आले.

दरम्यान ओवेसी यांच्या गाडीवर फायरिंग झाल्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.ओवेसी हे देशाच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहे. ते आपल्या आक्रमक अन तडाखेबंद भाषणांसाठी देशात ओळखले जातात. आजच्या हल्ल्यानंतर ओवेसी काय भाष्य करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. ओवेसी यांच्यावर कोणी प्राणघातक हल्ला केला ? कुणाच्या इशाऱ्यावरून हा हल्ला झाला? या कटामागे हल्लेखोरांचा नेमका इरादा काय होता ? या प्रश्नांचा उलगडा उत्तर प्रदेश पोलिसांना तातडीने करावा लागणार आहे.

ओवेसी यांच्या गाडीवर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेचे पडसाद उत्तर प्रदेश निवडणुकीत उमटल्याशिवाय राहणार नाहीत. यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांना या घटनेमागच्या मुळ कारणांचा तातडीने उलगडा करण्याचे मोठे अव्हान असणार आहे.

कुणाच्यात दम आहे ? मला मारून दाखवा – ओवेसी

गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर ओवेसी हे आक्रमक झाले आहेत. या घटनेनं आपण भीनार नाही, आणि सुरक्षाही घेणार नाही असे सांगत मी माझा उत्तर प्रदेश मधील प्रचार सुरूच ठेवणार आहे. ज्याच्या कुणाच्यात दम असेल त्याने मला मारून दाखवावं अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. एकुणच ओवेसी हे गोळीबाराच्या घटनेनंतर प्रचंड संतप्त आणि आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. ओवेसींकडून गोळीबाराचा मुद्दा अगामी प्रचारात मोठ्या ताकदीने मांडणार हेच यातून दिसत आहे.

इम्तियाज जलील संसदेत आक्रमक

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या गोळीबाराच्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचे पडसाद संसदेत उमटले. AIMIM चे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेचा निषेध नोंदवत, या प्रकरणातील हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.