Sunil Divre murder case । खळबळजनक : शिवसेना नेते सुनिल डीवरे यांची गोळ्या झाडून हत्या !

यवतमाळ : Yavatmal shivsena Leader Sunil Divre murder case | विदर्भातील यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेनेचे नेते सुनील डीवरे यांची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने विदर्भात मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण या घटनेमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सुनील डीवरे हे यवतमाळच्या ग्रामीण भागातील शिवसेनेचे प्रसिद्ध नेते होते. त्यांची अशाप्रकारे निर्घृण हत्या करण्यात आल्याने जिल्ह्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे.(Yavatmal shivsena Leader Sunil Divre murder case)

अज्ञात हल्लेखोरांनी यवतमाळमध्येच सुनील डीवरे यांच्या घरात घुसून डीवरे यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहेत. सुनील डीवरे हे यवतमाळच्या भांब राजा गावाचे रहिवासी होते. ते यवतमाळच्या ग्रामीण भागातील प्रख्यात शिवसेनेचे नेते होते. दोन ते तीन अज्ञात तरुणांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Yavatmal shivsena Leader Sunil Divre murder case)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सुनील डीवरे यांना तातडीने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात नेलं. पण तोपर्यंत उशिर झाला होता. रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीच सुनील डीवरे यांचं निधन झालं होतं.

संबंधित घटनेची माहिती मिळताच यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडलं जावं या मागणीवरून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. शिवसेना नेत्याच्या हत्येमुळे यवतमाळ सह महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. (Yavatmal shivsena Leader Sunil Divre murder case)