UP Election 2022 | युपीत भाजपला लागला सुरूंग : ना ईडीची… ना सीबीआयची भीती, 3 मंत्र्यांसह 11 आमदारांनी दिले राजीनामे, भाजप बॅकफूटवर !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : देशात पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.पाच पैकी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे (UP Election 2022) संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ऐरवी निवडणुका जाहीर झाल्या की विरोधी पक्षांमधील मोठ्या नेत्यांना ईडी, सीबीआयचा (ED,CBI) धाक दाखवून आपल्या पक्षात घेण्याचा धडाका भाजपकडून (BJP) राबवला जातो, परंतु उत्तर प्रदेश निवडणूकीत (Uttar Pradesh elections) मात्र उलटे फासे पडताना दिसत आहेत. (11 MLAs, including 3 ministers, resign in Uttar Pradesh)

उत्तर प्रदेशमध्ये रोज एक राजकीय भूकंप होऊ लागला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू अर्थात भाजप आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भाजपची साथ सोडत आहेत. याशिवाय काही आमदारांनी राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये ओबीसी नेत्यांचा मोठा सहभाग आहे. राजीनामास्त्रामुळे भाजप पुरती घायाळ झाली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 7 टप्प्यात होणार आहे. या निवडणुकीत भाजप विरूध्द सपा (BJP vs SP) असा थेट सामना असणार आहे. काँग्रेसही प्रियंका गांधींच्या ( Priyanka gandhi) नेतृत्वाखालील युपीत नवे प्रयोग करताना दिसत आहे. मै लडकी हूँ .. लड सकती हूँ हे कॅम्पेन युपीत लोकप्रिय ठरत आहे. दरम्यान भाजपला रोज हादरे बसत आहेत. भाजपमधून अत्तापर्यंत 3 मंत्री आणि 11 आमदारांनी बंड केले आहे. लवकरच हे नेते समाजवादी पक्षात प्रवेश करतील असे बोलले जात आहे. (11 MLAs, including 3 ministers resign in Uttar Pradesh)

उत्तर प्रदेश भाजपमधून बाहेर पडलेल्या मंत्र्यांमध्ये स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान, धरम सिंह सैनी (Swami Prasad Maurya, Dara Singh Chouhan, Dharam Singh Saini) या तीन मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय योगींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपमधून बाहेर पडलेले आमदार खालील प्रमाणे

1) आमदार राधाकृष्ण शर्मा ( बदायू जिल्हा)
2) आमदार राकेश राठोड (सीतापूर)
3) आमदार माधुरी वर्मा ( नानपारा)
4) आमदार जय चौबे ( संत कबीरनगर)
5) आमदार भगवती सागर ( बिल्हौर,कानपूर)
6) आमदार ब्रिजेश प्रजापती
7) आमदार रोशन लाल वर्मा
8) आमदार विनय शाक्य
9) आमदार अवतारसिंह भदाना
10) आमदार मुकेश वर्मा
11) आमदार बाळाप्रसाद अवस्थी

1) MLA Radhakrishna Sharma (Badaun District)
2) MLA Rakesh Rathod (Sitapur)
3) MLA Madhuri Verma (Nanpara)
4) MLA Jai Choubey (Sant Kabirnagar)
5) MLA Bhagwati Sagar (Bilhaur, Kanpur)
6) MLA Brijesh Prajapati
7) MLA Roshan Lal Verma
8) MLA Vinay Shakya
9) MLA Avtar Singh Bhadana
10) MLA Mukesh Verma
11) MLA Balaprasad Awasthi