Pune Accident news | पुणे – येरवडा भागातील शास्त्रीनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, 3 ठार तर अनेक जखमी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Pune Accident news | पुणे शहरातील येरवडा भागातून एक अपघाती घटना समोर आली आहे. शास्त्रीनगर भागातील आठ नंबरच्या गल्लीतील एका नव्या इमारतीचा स्लॅब कोसळून 3 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. याबाबत ANI या वृत्तसंस्थेने घटनेची माहिती ट्विट केली आहे.

याबाबत सविस्तर असे की, पुण्यातील येरवडा भागातील शास्त्री नगर येथील वाडिया बंगला गेट नंबर आठ परिसरात एका नव्या इमारतीचे बांधकाम चालू आहे.

या इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी स्लॅब कोसळण्याची दुर्दैव घटना घडली. या घटनेत काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Pune Accident news)

घटनेची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले आहे. कोसळलेल्या स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बचाव पथकाकडुन वेगाने बचावकार्य राबवले जात आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. प्रशासनाकडून अजून कुठलीच अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. सध्या घटनास्थळी वेगाने बचाव कार्य सुरू आहे. (Pune Accident news)