Agneepath Recruitment Scheme 2022, केंद्र सरकारकडुन अग्नीपथ योजनेची घोषणा, सैन्य दलात बंपर भरती अग्निपथ योजनेविषयी जाणुन घ्या सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Indian Army bharti Agneepath Recruitment Scheme 2022 । देशात मागील दोन वर्षांपासून सैन्यभरती थांबली होती मात्र आता सैन्य भरतीची ( Army Recruitment ) स्वप्न पाहणाऱ्या देशातील लाखो तरुणांसाठी आनंदाची एक बातमी समोर आली आहे.

केंद्र सरकारने आज सैन्य भरतीची मोठी घोषणा केली. सैन्यभरती संदर्भात केंद्र सरकारची मोठी घोषणा केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सैन्य भरतीसाठी अग्निपथ (Agneepath Recruitment Scheme) या नवीन योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सैन्यात दाखल होणाऱ्या जवानांना यापुढे अग्निवीर (agniveer) असे संबोधले जाणार आहे.

केंद्र सरकारने लष्कराच्या तिन्ही दलाच्या सैन्य भरतीसाठी (Army bharti 2022) घोषित केलेली अग्निपथ योजना ‘टूर ऑफ ड्युटीच्या’ धर्तीवर योजना बनवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सैनिकांना फक्त चार वर्षे सेवा करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अग्निपथ या योजनेची घोषणा संरक्षण विभागाच्या लष्करी व्यवहार विभागाकडून करण्यात आली आहे. लवकरच ही योजना कार्यान्वित होणार असून येत्या ऑगस्टमध्ये यासंदर्भातील पहिली लष्कर भरती होऊ शकते असेही सूत्रांनी सांगितले.

अग्नीपथ योजनेतून लष्करात भरती होणाऱ्या जवानांना चार वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्तीचा पर्याय उपलब्ध असणार आहे. या काळात जवानांच्या सेवांचा आढावा घेतला जाईल काहींना कायम ठेवण्याचाही पर्याय उपलब्ध असेल.

चार वर्षाच्या नोकरीमध्ये सहा आणि नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणाचा समावेश असेल. चार वर्षाची सेवा संपल्यानंतर सैनिकांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळणार नाही.परंतु एकरकमी रक्कम दिली जाणार आहे.

Agneepath Recruitment Scheme 2022, Indian Army bharti 2022, Central Government announces Agneepath Yojana, Bumper Recruitment in Army 2022, what is Agneepath Yojana,

संरक्षण विभागाने लष्करी भरती संदर्भात जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमध्ये कोणत्याही रेजिमेंट भरती होण्याचा मार्ग उपलब्ध असणार आहे. लष्करामध्ये यापुढे जात धर्म आणि प्रदेशानुसार भरती होणार नाही. ही भरती भारतीय म्हणून होईल.