नरेंद्र मोदींसमोर राज्यपालांनी वाचला तक्रारींचा पाढा, सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष भडकणार ?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजभवनातील ‘क्रांती गाथा’ या भूमीगत कलादानाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री आणि राज्याच्या तक्रारींचा पाढा वाचला. (Governors read complaints in front of PM Narendra Modi, will the governor’s struggle against the Maharashtra government erupt?)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातील काही महत्त्वाचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत परखडपणे मांडल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष पेटणार की काय असेच चित्र निर्माण झाले आहे.

राज्यपालांनी आपल्या आजच्या भाषणामध्ये औरंगाबादचा पाणी प्रश्न तसेच रखडलेले सिंचन प्रकल्प या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले. या वेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न तातडीने निकाली काढावा अशी विनंती राज्यपालांनी मोदींना केली.

ब्रेकिंग : सैन्य दलात बंपर भरती, केंद्र सरकारकडुन अग्नीपथ योजनेची घोषणा, अग्निपथ योजनेविषयी जाणुन घ्या सविस्तर.

राज्यपाल पुढे म्हणाले की, राज्यात गेल्या दोन वर्षांपासून विकास महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत तसेच राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प रखडले आहेत. यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

राज्यपाल म्हणाले. मोदींच्या स्नेह, प्रेम आणि विश्वासामुळे आपण महाराष्ट्रात आलो, आपली येण्याची इच्छा नव्हती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विद्यापीठांमध्ये होणारे कार्यक्रम इंग्रजीतून होत होते, मी त्यांना सांगितले की मराठीतून कार्यक्रम करावेत, मुख्यमंत्र्यांना हे कसे वाटेल हे माहित नाही, असा टोलाही त्यांनी सीएम उद्धव ठाकरेंना लगावला. नागपूर आणि मुंबई विद्यापीठात काही उपक्रम राबवल्याची माहितीही त्यांनी सांगितली.