अग्निवीर आर्मी भरती 2022 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : केंद्र सरकारने हाती अग्निवीर सैन्य भरती योजने अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात येत्या 23 ऑगस्ट पासून सैन्य भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.

Important News for Candidates who have applied for Agniveer Army Recruitment 2022

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर येथे, 23 ऑगस्ट 2022 ते 09 सप्टेंबर 2022 या कालावधीत अग्निवीर सैन्य भरती मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी हजर राहणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन प्रवेशपत्र काढावे लागणार आहे. कागदपत्रांसोबत प्रवेशपत्र असेल तरच मेळाव्यात प्रवेश दिला जाणार आहे. 

अहमदनगर जिल्हयातील अग्निवीर सैन्य भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, Army Recruitment Rally साठी www.joinindainarmy.nic.in या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेल्या प्रवेश पत्र (Admit card) व आवश्यक त्या सर्व कागदपत्रानुसारच, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर येथे, २३ ऑगस्ट २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या, अग्निवीर सैन्य भरती मेळाव्यासाठी प्रवेश दिला जाईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये यांनी केले आहे.