What is Red Orange Yellow Green Alert ? | हवामान खात्याच्या इशाऱ्यांचा अर्थ काय असतो? चला तर मग जाणून घेऊयात

जामखेड टाईम्स। सत्तार शेख |What is Red Orange Yellow Green Alert ? : हवामान विभागाकडून (Meteorological Department) पावसाळ्यामध्ये राज्याच्या कुठल्या भागात किती व कसा पाऊस पडू शकतो याचा हवामान अंदाज (Weather forecast) सातत्याने वर्तवला जातो. हा अंदाज वर्तवताना काही इशारे (Weather Alert)दिले जातात. त्यातून काही शब्द आपल्या नेहमी कानावर पडतात.

जसे की ग्रीन अलर्ट (Green alert) ऑरेंज अलर्ट (Orange alert) येलो (Yellow alert) आणि रेड अलर्ट (Red alert) या अलर्टचा नेमका अर्थ काय असतो ? हिच माहिती जाणून आज आपण जाणून घेऊयात. (What is Red, Orange, Yellow, Green Alert means? So let’s find out)

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो आणि परिस्थितीच्या तीव्रतेनुसार, ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केले जातात. म्हणजेच नागरिकांना सतर्क केलं जातं. यातून कुठल्या भागात धोका अधिक किंवा कमी होणार याची माहिती जनतेपर्यंत जाते. यातून उपाययोजना राबवण्यास मदत होते. (What is Red Orange Yellow Green Alert ? So let’s find out)

चला तर मग, आता आपण सविस्तर जाणून घेऊयात हवामान विभागाकडून दिल्या जाणाऱ्या अलर्ट विषयी ( What is Red Orange Yellow Green Alert means? So let’s find out)

रेड अलर्ट म्हणजे काय ? (What is a red alert?)

रेड अलर्ट म्हणजे मोठी नैसर्गिक आपत्तीची शक्यता. नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर किंवा ओढवण्याची शक्यता असल्यास एखाद्या विशिष्ट भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट जारी करण्यात आलेल्या प्रदेशातील स्थानिक प्रशासन, आपत्कालीन यंत्रणांनी अधिक सतर्क रहाणं गरजेचं असतं. संकट अधिक धोकादायक, तीव्र असल्यास, सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट देण्यात येतो.

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय ? (What is Orange Alert?)

कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते आणि त्यासाठी नागरिकांना सतर्क करण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला जातो. यामध्ये वीजपुरवठा खंडीत होणे, वाहतूक ठप्प होणे असे प्रकार होऊ शकतात.

यलो अलर्ट म्हणजे काय ? (What is Yellow Alert?)

हवामानातील बदलांमुळे पुढील काही दिवसांत संकट ओढवण्याची शक्यता असल्यास यलो अलर्ट जारी केला जातो. या संकटामुळे दैनंदिन कामावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधगिरीचा इशारा दिला जातो म्हणजेच ‘यलो अलर्ट’ जारी केला जातो.

ग्रीन अलर्ट म्हणजे काय ? (What is a green alert?)

हवामान स्वच्छ असणार आहे, पुढे  कोणत्याही संकटाची चाहुल नाही. सारं काही सुरळीत आहे, हेच ग्रीन अलर्ट दर्शवतो असतो.

वरिल चार अलर्टच्या माध्यमांतून राज्यात आज कुठल्या भागात कोणत्या स्वरूपात पाऊस पडणार तसेच कुठल्या भागात कसे हवामान असेल याचा अंदाज जनतेला येतो. विशेषता: शेतकरी बांधवांचे हवामान अंदाजाकडे जास्त लक्ष असते. हवामान अंदाजानुसार बळीराजा आपल्या शेतीचे नियोजन करत असतो.(What is Red, Orange Yellow Green Alert ?)

नदीकाठच्या गावांसह धरण क्षेत्रातील गावांचेही हवामान विभागाच्या अंदाजाकडे सतत लक्ष असते. अतिवृष्टी व मुसळधार पावसाचा फटका सर्वात आधी नदीकाठच्या गावांना बसत असतो. (What is Red, Orange Yellow Green Alert ?)