महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठल्या भागात होणार अतिवृष्टी ? जाणून घ्या ताजा हवामान अंदाज

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यात सर्वत्र धुवांधार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात पूरस्थिती आहे. काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यातील इर्शाळगड गावात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. राज्यात आगामी ४ ते ५ दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे राज्य सरकारने रेड अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

Warning of heavy rain for next five days in Maharashtra, which area will get heavy rain? Know  latest weather forecast, maharashtra latest rain update,

एकिकडे राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढला असला तरी राज्यातील अनेक भागांना अजुनही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. अहमदनगर जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. अहमदनगरच्या कर्जत-जामखेड मतदारसंघाला मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. या भागातील नद्या नाले व इतर जलसाठे अजूनही कोरडेच आहेत. जलसाठ्यांमध्ये वाढ झाली नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण कायम आहे.

राज्यात मान्सून उशिरा दाखल झाला असला तरी जुलै महिन्याचा पंधरवडा उलटल्यानंतर राज्यात तुफान पाऊस सुरू आहे. गेल्या ३ दिवसांपासून झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पुरपरिस्थिती ओढावली असून यामुळे अनेक शहरांना पाण्याने वेढलं आहे. अशात नागरिकांची चिंता वाढवणारी एक बातमी आहे. ती म्हणजे हा मुसळधार पाऊस आणखी ५ दिवस मुक्काम ठोकणार आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

कोकणातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अगामी पाच दिवसांचा हवामान अंदाज

उत्तर कोकण (North Konkan )- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कालपासून म्हणजेच १९ जुलैपासून ते २३ जुलैपर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या दिवसांमध्ये संपूर्ण उत्तर कोकणात अति मुसळधार पाऊस होईल.

दक्षिण कोकण आणि गोवा (South Konkan & Goa )- दक्षिण कोकण आणि गोव्यातही २३ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र (South Madhya Maharashtra )- हवामान खात्याकडून दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पाऊस होईल. पण २३ जुलैपर्यंत तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही भागांमध्ये मध्यम ते तुरळक पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

मराठवाडा (Marathawada )- मराठवाड्यामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यानंतर मात्र मराठवाड्यातही पावसाचा जोर कमी होईल अशी माहिती आहे. यानंतर २३ तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र (North Madhya Maharashtra )- उत्तर मध्य महाराष्ट्रातही हवामान खात्याकडून सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वच जिल्ह्यांमध्ये २३ जुलैपर्यंत पाऊस होईल. पण २१ जुलैनंतर पावसाचा जोर थोडा

पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भ (East Vidarbha – West Vidarbha )- मुंबई आयमडीकडून पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भात २३ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस दाखल होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.