पाऊस लांबला.. पेरण्या खोळंबल्या..पण आता पावसाची प्रतिक्षा संपणार, येत्या 72 तासात मान्सून सक्रीय होणार – हवामान विभागाचा नवा अंदाज

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कोकण किनारपट्टीच्या वेशीवर खोळंबलेला मान्सून कोकणासह पुणे, मुंबई, कोल्हापूर सह ऊर्वरीत महाराष्ट्रात कधी सक्रीय होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. बिपरजाॅय चक्रीवादळामुळे मान्सून रखडला आहे. बंगाल उपसागरातील मान्सूनच्या दुसर्‍या शाखेने महाराष्ट्र एन्ट्री केलेली नाही, विदर्भात शुक्रवारी मान्सून पुर्व सरी कोसळल्या. येत्या 72 तासांत मान्सून महाराष्ट्रात विशेषता: मुंबईत दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

Rains are prolonged, sowings are disrupted, But now wait for rains will end, Monsoon will be active in next 72 hours - Meteorological department's new forecast, monsoon latest update,

यंदा हवामान विभाग व हवामान अभ्यासकांचे सर्व अंदाज फोल ठरले आहेत. मान्सून महाराष्ट्रात सर्व दुर दाखल झालेला नाही, दमदार पावसासाठी जुलै महिना उजाडण्याची शक्यता काही जण व्यक्त आहेत, तर हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार 29 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापेल, असा नवा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विदर्भात शुक्रवारी मान्सूनने हजेरी लावली आहे. उपराजधानी नागपूर सह अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी संथ तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक घाट परिसरात 25 तारखेपासून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 27 जून नंतर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात येऊ शकतो.

हवामान विभागाने सुरुवातीला 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला. मान्सून नेहमीप्रमाणे 1 जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवला. मान्सून 7 जूनला कोकणात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला. 9 जूनपर्यंत मान्सून पुणे, मुंबईसह  महाराष्ट्र  व्यापेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला.

मान्सून तळकोकणात 9 जूनला दाखल झाला खरा, मात्र मान्सून पुढे सरकला नाही. त्यानंतर मुंबई- पुण्यात मान्सून आगमनाची 16 जून ही नवी तारीख वर्तवण्यात आली. नंतर मान्सून आगमनाच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आणि 23 जून ही नवी तारीख जाहीर करण्यात आली. 23 जूनला काही ठिकाणी पावसाची हजेरी लागली. 

जून महिना मान्सून अभावी कोरडा गेला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पावसाची मोठी अपेक्षा आहे. येणारा जुलै महिना पावसाच्या बाबतीत निर्णायक ठरू शकतो, कारण ऑगस्ट महिन्यात अल निनो सक्रिय होण्याची आणि त्यामुळं पाऊस पुन्हा गायब होण्याची भीती आहे.

काही अपवाद वगळता वर्षानुवर्ष नियमित येणाऱ्या मॉन्सूनचा लहरीपणा अलिकडे वाढत चालल्याचं चित्र आहे. वारंवार येणारी चक्रीवादळे आणि मॉन्सूनचा बदललेला कालावधी याची साक्ष आहेत. यामुळे हवामान विभागाने स्वतःच्या ठोकताळ्यांमधे बदल करण्याची गरज आहे. कारण पाणी आणि शेतीचं सर्व नियोजन हवामान विभागाला प्रमाण माणूनच करण्यात येतं. 

पाऊस रखडल्यामुळे राज्यातील अनेक भागातील पेरण्या रखडल्या आहेत. यंदाचा खरिप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकरी पावसासाठी पांडुरंगाचा धावा करताना दिसत आहेत.