Earthquake in bhoom Politics : भूमच्या राजकारणात भूकंप : सुरेश कांबळेंनी धरली नवी राजकीय वाट

लवकरच कांबळे हे समर्थकांसह राष्ट्रवादीत दाखल होणार

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महत्वाचे नाव असलेल्या सुर्यकांत ऊर्फ सुरेशभाऊ कांबळे यांनी सत्ताधारी राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा रविवारी भूम येथे आयोजीत बैठकीत केली. कांबळे यांच्या या घोषणेमुळे भूमच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.Earthquake in bhoom Politics Suresh Kamble has taken a new political path

 

Earthquake in bhoom Politics Suresh Kamble has taken a new political path
Suresh Kamble has taken a new political path

सुरेशभाऊ कांबळे हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील महत्वाचे नाव आहे. सातत्याने सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष करणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी धनगर आरक्षणावरून काढलेली पदयात्रा विशेष गाजली होती. जामखेड तालुक्यातील चौंडी येथे या यात्रेचा झालेला समारोप राज्यात विशेष चर्चेत आला होता. तुफान गर्दी यावेळी उसळली होती.

Earthquake in bhoom Politics Suresh Kamble has taken a new political path
Suresh Kamble has taken a new political path

कोण आहेत सुरेश कांबळे ?

सुरेशभाऊ कांबळे हे भूम तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचे नाव आहे. कांबळे हे जय हनुमान संघटना व मल्हार आर्मी या दोन सामाजिक संघटनांच्या माध्यमांतून राज्यात सक्रीय आहेत. कांबळे यांनी या दोन सामाजिक संघटनांच्या माध्यमांतून राज्यात मोठे संघटन उभे केले आहे. राज्यात जिथे कुठे अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन कांबळे हे पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी संघर्ष करत आले आहेत. कांबळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भूम तालुक्यासह राज्यातही कांबळे यांच्या संघटनेचे बळ राष्ट्रवादीला मिळणार आहे.(Earthquake in bhoom Politics Suresh Kamble has taken a new political path)

Earthquake in bhoom Politics Suresh Kamble has taken a new political path

फेसबुक पोस्ट करत केली नव्या पक्ष प्रवेशाची घोषणा

आज भूम येथे पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी हितचिंतक, संघटनेचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची ‘विचारमंथन’ बैठक पार पडली.आपला गेल्या दशकाहुनचा अधिकचा राजकीय व सामाजिक प्रवास हा सत्तेच्या विरोधात राहिलेला आहे,याकाळात निस्वार्थी पणे सदैव माझ्या पाठीशी असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आज न्याय देणं गरजेचं आहे व तो न्याय सत्तेच्या माध्यमातून देऊ शकतो.सत्ता हे समाज कार्यकर्ता यांच्या उत्कर्षाचे मूळ आहे. समाजाचे, कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्ता असणं महत्वाचे आहे,तरच आपण प्रश्न सोडवू शकतो.हितचिंतक, पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांच्या एकविचाराने लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.(Suresh Kamble join ncp) माझ्या याआधीच्या काळातही आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होता व येणाऱ्या काळातही असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो !
– सुर्यकांत (सुरेश भाऊ) कांबळे

Earthquake in bhoom Politics Suresh Kamble has taken a new political path