कर्जत: बायकोच्या लफड्यांनी त्रस्त झालेल्या शिक्षकाची आत्महत्या, कर्जतमध्ये 18 जणांवर गुन्हे दाखल, तर 11 जण अटकेत !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 22 ऑक्टोबर 2022 । ऐन दिवाळीत कर्जत तालुक्याला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेत पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आणि तिच्या नातेवाईकांच्या मानसिक त्रासास कंटाळून एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनला 18 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील 11 आरोपींना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.

Teacher Sandeep Shete suicide case, Suicide of teacher suffering from his wife's Immoral relationship, 18 people in Karjat taluka have been charged, while 11 people have been arrested,

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि 21 रोजी पहाटेच्या सुमारास कोळवडी (ता.कर्जत) येथील प्राथमिक शिक्षक संदीप दत्तात्रय शेटे (वय -35) यानी आपली पत्नी सुवर्णा संदीप शेटे व तिचे नातेवाईक आणि इतरांच्या मानसिक छळास कंटाळून आणि काही दिवसांपूर्वी पत्नीच्या नातेवाईकाकडून झालेल्या मारहाणीतून वैफल्यग्रस्त झाल्याने संदीप यांनी चार पानांची चिठ्ठी लिहीत घरातील छताच्या पंख्यास दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.

या प्रकरणी मयत संदीप शेटे यांचे बंधू ज्ञानदेव दत्तात्रय शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात भादवी कलम 306, 504, 506, 34 सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(आर)(व्ही ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील फिर्यादीवरून अशोक गौतम डमरे, पप्पू उर्फ विकास बाबा गोरे (दोघे रा.कोळवडी, ता.कर्जत), चेतन सुदाम मोरे (वडारवस्ती, सिद्धटेक ता.कर्जत), संदीप काशिनाथ खराडे, लता अशोक डमरे, सचिन अशोक डमरे, नितीन अशोक डमरे,आकाश दत्ता डमरे, दत्ता उत्तम डमरे(सर्व रा. कोळवडी ता.कर्जत), शहाजी गोरख पोटे, संगीता गोरख पोटे, गोरख रामचंद्र पोटे(सर्व रा वडारवस्ती सिद्धटेक) नाना यशवंत डमरे, नाना डमरे यांची दोन मुले, रमेश डमरे यांची पत्नी, सुवर्णा संदीप शेटे आणि बाबा तुकाराम गोरे (सर्व रा.कोळवडी ता.कर्जत) या 18 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 11 जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

दरम्यान आत्महत्या करण्यापुर्वी मयत शिक्षक संदिप शेटे यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता.मयत शिक्षक संदिप शेटे हे नांदगाव येथील प्राथमिक शाळेत कार्यरत होते. त्यांचा 13 मार्च 2011 साली विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत.

फिर्यादीत म्हटले आहे का, सिध्दटेकच्या वडारवस्ती येथील चेतन सुदाम मोरे या तरूणाशी मयत शिक्षक संदिप यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे 6 मे 2014 साली आढळून आले होते. त्यानंतर 23 मार्च 2022 रोजी मयत संदिप यांनी आपल्या पत्नीचे मोबाईल तपासले असता विकास बाब गोरे आणि संदिप ऊर्फ गोट्या काशिनाथ खराडे या दोघांशी अनैतिक संबंध असल्याचे आढळून आले होते. ही बाब संदिप यांनी पत्नीच्या नातेवाईकांना कळवली होती.

त्यानंतर दोन्हीकडील मंडळींनी एकत्र येत बैठक घेतली. बैठकीत संदिप यांच्या पत्नीने अनैतिक संबंधाची कबुली दिली. त्यानंतर घटस्फोट द्या अशी मागणी केली. यावेळी पत्नीचे मामा अशोक डमरे यांनी तिला समजावून सांगण्याची हमी दिली, तुम्ही घटस्फोट घेऊ नका असे म्हणाले. तुम्ही शिक्षक आहात, घटस्फोट घेतला तर तुमची नौकरी घालवू अशी धमकी दिली होती.

त्यानंतर मयत शिक्षक संदिप ज्या गावात नोकरीस होते तेथे जाऊन पत्नी आणि तिच्या नातेवाईकांना शिविगाळ केली होती. त्यानंतर काही दिवसाने मयत संदिप यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली होती. यात कुटुंबिय जखमी झाले होते.

अनैतिक संबंधात अडकलेल्या पत्नीकडून तसेच सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक त्रासास कंटाळून शिक्षक संदिप शेटे यांनी शुक्रवारी पहाटे आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने कर्जत तालुक्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे.