जामखेड : 1 लाख 78 हजार लाभार्थ्यांना होणार आनंदाचा शिधा किटचे वाटप, आमदार राम शिंदे यांच्या हस्ते चोंडी येथून मोहिमेची सुरुवात

जामखेड टाइम्स वृत्तसेवा। 22 ऑक्टोबर 2022 । राज्य सरकारने दिवाळी सणानिमित्त अन्नासुरक्षा योजनेसह अंत्योदय योजनेमधील लाभार्थी यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अंमलबजावणी राज्यभरात सुरुवात झाली आहे. जामखेड तालक्यात या योजनेचा शुभारंभ आज चोंडी येथून करण्यात आला.

Jamkhed, Anandacha shidha ration kits will be distributed to 1 lakh 78 thousand beneficiaries, campaign started from Chondi by MLA Ram Shinde

आमदार राम शिंदे आणि तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते  जामखेड तालुक्यातील चोंडी येथून आनंदाचा शिधा वाटप मोहिमेस आज 22 रोजी शुभारंभ करण्यात आला.  आनंदाचा शिधा मोहिमेत 100 रूपयात 1 किलो रवा, 1 किलो साखर,1 किलो चणाडाळ ,1 किलो पामतेल असे किट प्रत्येक कुटुंबाला वाटप केले जाणार आहे.

जामखेड तालुक्यात अन्नासुरक्षा योजनेतील  25446 कार्ड धारक आणि अंत्योदय योजनेतील 5556 कार्ड धारक आहेत. एकुण 31002 कार्ड धारकांमधील 178200 लाभार्थ्यां या योजनेचा लाभ मिळणार आहे. जामखेड तालुक्याला सर्व दिवाळी शिधा संच प्राप्त झाले असून आजपासून स्वस्त धान्य दुकानामधून वाटप करण्यास सुरवात झाली आहे.

Jamkhed, Anandacha shidha ration kits will be distributed to 1 lakh 78 thousand beneficiaries, campaign started from Chondi by MLA Ram Shinde

आमदार राम शिंदे यांच्या हस्ते दिवाळी शिधा वाटपाची सुरुवात चोंडी येथील स्वस्त धान्य दुकानातून आज 22 रोजी करण्यात आली. प्रसंगी लाभधारक उपस्थित होते.तसेच सोमनाथ पाचारणे, पांडूरंग उबाळे, सह आदी उपस्थित होते. शासनाकडून दिवाळीसाठी गोरगरीब लोकांसाठी दिलेल्या दिवाळी शिधाबाबत लाभार्थ्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

“आनंदाचा शिधा’ कीटच्या माध्यमातून गरिबांना १०० रूपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ व पामतेल वाटप केले जाणार आहे.जामखेड तालुक्यात एकूण 103 दुकाने असून नियोजनपूर्वक आराखडा तयार करून 2 दिवसात हे वाटप पूर्ण केले जाणार आहे.त्यामुळे जामखेड तालुक्यातील सर्व लाभार्थी यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.