जामखेडचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक रऊफ शेख यांचा राष्ट्रपती पदकाने गौरव !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक शाखेत पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेले जामखेडचे सुपुत्र पोलीस उपनिरिक्षक रऊफ शेख यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पदकाने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

Sub-Inspector of Police Rauf Shaikh son of Jamkhed honored with President's Medal

मुंबई येथे राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या समारंभात पोलीस उपनिरिक्षक रऊफ शेख यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानपुर्वक राष्ट्रपतीपदक प्रदान करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रभात कुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक जयकुमार उपस्थित होते.

महाराष्ट पोलीस दलातील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल रऊफ शेख यांना १५ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रपती पदक जाहिर झाले होते.मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदक वितरण सोहळा घेण्यात आला नव्हता.

रऊफ शेख हे मुळचे जामखेडचे असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले.माध्यमिक शिक्षण नगर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण श्रीरामपुर येथे झाले आहे.

रऊफ शेख यांनी आतापर्यंत पोलीस मुख्यालय , श्रीरामपुर शहर व तालुका, संगमनेर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग याठिकाणी जबाबदारी सांभाळली आहे.

रऊफ शेख यांना १ मे २०१९ मध्ये महाराष्टदिनी राज्याचे पोलीस महासंचालकांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले  आहे. शेख यांना विविध सेवाभावी ,सामाजिक संस्थांनी उल्लेखनीय कामाबद्दल गौरविले आहे.

घरातील चार जण पोलीस सेवेत.

रऊफ शेख यांचे वडील (कै.) समद इस्माईल शेख हे अहमदनगर पोलीस मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर होते. रऊफ शेख यांना एकुण चार भाऊ आहेत. यापैकी थोरले भाऊ (कै.) ताहेर समद शेख हे पुणे येथे गुन्हे अन्वेषण शाखेत पोलीस निरिक्षक पदावर होते. तर दुसरे भाऊ फारूख समद शेख हे सध्या मुंबई रेल्वेमध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. रऊफ शेख यांचे अन्य दोन भाऊ मुस्ताक व जमील हे जामखेड येथे स्वता:च्या व्यवसायात कार्यरत आहेत.