जामखेड वाहतुक शाखेची दमदार कामगिरी, 10 महिन्यांत केल्या 3936 केसेस आणि 23 लाखांचा दंड वसुल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 31ऑक्टोबर 2022 । सत्तार शेख। वाहतुक कोंडीसाठी प्रसिध्द असलेल्या जामखेड शहरात वाहतुक शिस्त लावण्यासाठी सरसावलेल्या जामखेड वाहतुक शाखेने गेल्या दहा महिन्यांत तब्बल 3936 केसेस करत तब्बल 23 लाखांचा दंड वसुल करण्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काँस्टेबल अजिनाथ जाधव यांच्या टीमने केली.

Strong performance of Jamkhed Transport Branch, 23 lakh fines were collected in 10 months, jamkhed latest news,

जामखेड शहरातील खर्डा चौक हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. या भागात गेल्या काही वर्षांत नेहमी वाहतूक कोंडीची समस्या होत असल्याने प्रवासी तसेच नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागायचा, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे जामखेडला रूजू होताच त्यांनी जामखेडच्या वाहतुक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी लक्ष घातले. यासाठी त्यांनी जामखेड वाहतुक शाखेचे कर्मचारी पोलिस काँस्टेबल अजिनाथ जाधव, पोलिस काँस्टेबल दिनेश गंगे, तसेच होमगार्ड रफिक तांबोळी यांच्या माध्यमांतून वाहतुक सुधारण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना हाती घेतल्या.

यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला होता, तसेच शहरात दुचाकी पार्किंगसाठी शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोरी लावल्या, यामुळे दुचाकी स्वार दोरीच्या आत आपली वाहने लावू लागले, यामुळे वाहतुकीची समस्या निकाली निघाली. तसेच शहरात ठिकठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावले यासाठी जामखेड नगरपरिषदेने सहकार्य केले. नो पार्किंगचे बोर्ड लावल्यामुळे शहरात रस्त्याच्या कडेला मोठ – मोठ्या गाड्या लावणे बंद झाले. यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला.

दरम्यान, जामखेड शहरात वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी पुर्वी चौकात वाहतुक पोलिस नसायचे परंतू पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड जामखेडला आल्यापासून खर्डा चौकात वाहतुक पोलिस खर्डा चौकात नेहमी असतो, त्यामुळे चौकातील वाहतूक कोंडीला लगाम लागला आहे.

जामखेड वाहतुक शाखेने गेल्या 10 महिन्यात 3936 कारवाया करत वाहतुकीस शिस्त लावली, अहमदनगर जिल्ह्यात जामखेड वाहतुक शाखेची कारवाई सर्वात मोठी आहे. जामखेड वाहतुक विभागाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी कौतुक केले आहे.

1 जानेवारी 2022 ते 31 ऑक्टोबर 2022

  • विना हेल्मेट  – 91 केसेस, 45 हजार 500 दंड
  • ट्रीप्लसीट –  60 केसेस 60 हजार दंड
  • विदाऊट शिट बेल्ट – 228 केसेस 45 हजार 600 दंड
  • नो पार्किंग – 2714 = 15 लाख 63 हजार दंड
  • वाहन चालवताना फोनवर बोलणे –  39 केसेस, 39 हजार दंड
  • फॅन्सी नंबर – 12 केसेस 12 हजार दंड
  • ब्लॅक काच – 57 केसेस – 23 हजार 500 दंड
  • विदाऊट इन्सुरन्स 27 केसेस 58 हजार दंड
  • इतर गुन्हे  – 6 लाख दंड वसुल
  • एकुण दंड वसुल = 22 लाख 72 हजार 700 रूपये