भाजप खासदाराच्या कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू , गुजरातच्या मोरबी पुल दुर्घटनेत 150 जणांचा मृत्यू !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या गुजरातमधील मोरबी पुल दुर्घटनेत अत्तापर्यंत 150 जणांचे बळी गेले आहेत.अनेक जखमींवर उपचार सुरु आहेत. घटनास्‍थळी अजूनही बचावकार्य सुरु आहे. या भीषण दुर्घटनेत भाजप खासदार मोहनभाई कुंदरिया यांच्या कुटुंबांतील 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

Gujarat Morbi bridge collapse, Morbi bridge incident 12 members of BJP MP's family were  died, 150 people have died in the Morbi bridge collapse so far,

भाजप खासदार मोहनभाई कुंदरिया यांचे कुटुंबीय छट पुजेसाठी मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलत्या पुलावर गेले होते. त्याचवेळी केबल पुल कोसळण्याची घटना घडली. या घटनेत भाजप खासदार मोहनभाई कुंदरिया यांच्या बहिणीच्या घरातील 12 जणांचा मृत्यू झाला. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.

Gujarat Morbi bridge collapse, Morbi bridge incident 12 members of BJP MP's family were  died, 150 people have died in the Morbi bridge collapse so far,

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणारी एक घटना रविवारी रात्री गुजरातमधून समोर होती. या घटनेत गुजरातमधील राजकोटच्या मोरबी येथील मच्छू नदीवरील केबल पुल कोसळला. या पुलावर तब्बल 400 ते 500 जण होते. क्षमतेपेक्षा अधिक लोक झूलत्या पुलावर जमल्याने पुल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत अत्तापर्यंत 150 जणांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये लहान मुले, महिला आणि पुरूष यांचा समावेश आहे. जखमींवर विविध रूग्णालयात उपचार केले जात आहेत. अजूनही बचावकार्य सुरुच आहे.

Gujarat Morbi bridge collapse, Morbi bridge incident 12 members of BJP MP's family were  died, 150 people have died in the Morbi bridge collapse so far,

दरम्यान, मच्छू नदीवरील केबल पुल हा खूप जूना आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली होती, हा पुल तब्बल सात महिने बंद होता. पाच दिवसांपूर्वीच हा पुल नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता, परंतू रविवारी पुलावर जमलेल्या शेकडो नागरिकांच्या गर्दीमुळे हा पुल कोसळण्याची दुर्घटना घडली.

Gujarat Morbi bridge collapse, Morbi bridge incident 12 members of BJP MP's family were  died, 150 people have died in the Morbi bridge collapse so far,

घटनास्‍थळी स्थानिक प्रशासन, नागरिक आणि NDRF ची पाच पथके, हवाई दलातील गरुड कमांडो पथक, भारतीय नौदलाच्या 50 कर्मचार्‍यांसह, IAF चे 30 कर्मचारी, लष्कराच्या 2 तुकड्या आणि अग्निशमन दलाच्या 7 तुकड्या राजकोट, जामनगर, दीव आणि सुरेंद्रनगर येथून आधुनिक उपकरणांसह मोरबीत बचावकार्य करत आहेत. तसेच SDRF च्या 3 तसंच राज्य राखीव पोलिसांच्या (SRP) दोन तुकड्याही बचाव आणि मदतकार्य करत आहेत. राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आयसोलेशन वॉर्डही तयार करण्यात आला आहे. मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.

Gujarat Morbi bridge collapse, Morbi bridge incident 12 members of BJP MP's family were  died, 150 people have died in the Morbi bridge collapse so far,

मोरबी दुर्घटनेतील पुल कोसळतानाचा थरारक व्हिडीओ