जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील श्री कृष्ण नगर (मोरे वस्ती) या गेल्या सहा दिवसांपासून सुरु आसलेला श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संगीत भागवत कथा सह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दि १२ ऑगस्ट रोजी भागवत कथाकार ह. भ. प. दयाल चैतन्य प्रभु यांच्या संगीत भागवत कथेने सुरू झाली. तर दि १७ रोजी भागवत ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. गुरुवार दि १८ रोजी महीला भजन मंडळ, कृष्ण कथा अभिषेक, श्रीकृष्ण जन्म अभिषेक करण्यात आला.
गुरुवारी रात्री श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला भाविकांनी एक तास भक्तीगीते सादर केली. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा विधीवत पुजा अर्चा करून पाळणा हालवून केला. त्यानंतर महाआरती केली. सोहळ्यास जामखेड शहरातील नागरिकांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदीराची लाईट डेकोरेशन सह फुलांना सजावट केली होती.
शुक्रवार दि १९ रोजी सकाळी ह. भ. प. दयाल चैतन्य प्रभु यांचे काल्याचे कीर्तन व दहीहंडी कार्यक्रम संपन्न झाला. तसेच कार्यक्रमाची सांगता दुपारी महाप्रसाद वाटप करुन करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री कृष्ण मित्र मंडळ, शंभुराजे राजे मित्र मंडळ, योद्धा ग्रुप जामखेड व परीसरातील नागरीकांनी परीश्रम घेतले.