राजस्थानमधील घटनेचे जामखेडमध्ये पडसाद ; आरोपींना फाशी द्या – दलित संघटनांची मागणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सवर्णांसाठी ठेवलेल्या माठातून पाणी पिल्याने 9 वर्षीय दलित विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्याची घटना राजस्थानमधील जालोरमध्ये घडली आहे. या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत. जामखेड तालुक्यातही याचे पडसाद उमटले. जामखेड तालुक्यातील विविध आंबेडकरवादी दलित संघटनांकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

Impact of incident in Rajasthan in Jamkhed; Hang the accused - Dalit organizations demand

राजस्थानमधील जालोरमध्ये दलित विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी जामखेड तालुक्यातील विविध आंबेडकरवादी संघटना आणि संस्थांनी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे आणि पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी अशोक आव्हाड, अशोक समुद्र, परमेश्वर मोरे, देवा मोरे, विजय रणसिंग, बापु मोरे,पंडीत मोरे, मंगेश घोडेस्वार, सुर्यकांत सदाफुले, अशोक समुद्र, विजय रणसिंग, संदिप मोरे, हौसराव थोरात, प्रकाश शिंदे, किरण मोरे, शहाजी मोरे, देवा मोरे,जगदिश थोरात, संतोष मोरे, दिपक समुद्र , भिमराज शिंदे, राजु मोरे, बापू मोरे, सचिन सोनटक्के, विजय समुद्र आदी उपस्थित होते.