Pune IAS Transfers: पुण्यातील बड्या IAS आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे झाली बदली, जाणून घ्या
पुणे, ६, जूलै २०२३ : राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून विविध खात्यांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु केले आहे. सरकारकडून पुणे शहरात कार्यरत असलेल्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. (Pune IAS Transfers)
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होताच सरकारने वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे खांदेपालट केले आहे. बदल्या करण्यात आलेल्या बड्या अधिकाऱ्यांमध्ये सचिंद्र प्रताप सिंग, ओम प्रकाश बकोरिया, डाॅ प्रशांत नरनावरे, विमला आर या IAS अधिकाऱ्यांचा समावेश आहे
पुणे PMPML च्या अध्यक्षपदी व व्यवस्थापकीय संचालक म्हणून सचिंद्र प्रताप सिंग यांची बदली करण्यात आली आहे.
पुणे PMPML च्या अध्यक्षपदी व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेले ओम प्रकाश बकोरिया यांची पुणे येथे समाज कल्याण आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
पुणे येथे समाज कल्याण आयुक्त म्हणून असलेले डाॅ प्रशांत नरनावरे यांची पुणे येथे महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
पुणे येथे महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून कार्यरत विमला आर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, M.S. खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.