Nashik Bribe News : 15 हजाराची लाच स्वीकारताना पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले । Police Sub-Inspector Ganpat Mahadu Kakad
नाशिक, 7 जूलै 2023 : नाशिक जिल्ह्यात लाचखोरीच्या वाढत्या घटना चिंताजनक बनल्या आहेत. रोज कुठल्या ना कुठल्या विभागातील एक तरी अधिकारी किंवा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत सापडत आहे. काही दिवसांपुर्वी दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी यांच्यावर एसीबीने कारवाई केली होती.आता पोलिस दलातून एक बातमी समोर आलीय.15 हजाराची लाच स्विकारताना पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. गुरूवारी 6 जूलै 2023 रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
नाशिकमध्ये लाचखोरीचा भस्मासुर बोकाळला आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने लाचखोरीचे प्रकरणे उघडकीस येत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्रिंबकेश्वरमधील दोन तलाठ्यांना लाच घेताना पकडण्यात आले होते. आता नाशिक आयुक्तालयातील नाशिक रोड पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकत अटक करण्यात आली आहे. गणपत काकड असे लाचखोर पोलिस उप निरीक्षकाचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक गणपत महादू काकड यांनी तक्रारदाराकडे 5 जूलै 2023 रोजी 25 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 15 हजाराची लाच स्विकारताना पोलिस उपनिरीक्षक गणपत महादू काकड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी दुपारी रंगेहाथ पकडले. या कारवाईने नाशिक पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात पोलिस हवालदार बास्किर,पोलिस नाईक प्रकाश महाजन, महिला पोलिस नाईक ज्योती शार्दूल यांचा समावेश होता.
लाचखोर पोलिस उपनिरीक्षक गणपत काकड यांना 15 हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या वतीने काकड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकड हे एसीबीच्या कस्टडीत आहेत.