Pik Vima Registration 2023 : पीक विमा नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी जादा पैसे देऊ नये – कृषि आयुक्त सुनिल चव्हाण
पुणे, दि.६ जूलै २०२३ : Pik Vima Registration 2023 : शेतकऱ्यांकडून पीक विमा (Pik Vima) योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कमेची मागणी होत असल्यास संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण (krushi Aayukt Sunil Chavhan) यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना केवळ १रुपया भरून https://pmfby.gov.in या पोर्टलवर पीक विमा (Pik Vima Yojna) योजनेतील सहभागाची नोंदणी करता येते. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु. ४० देण्यात येते. (Pik Vima Registration 2023)
प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhanmantri Pik Vima Yojana) खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामाकरिता ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन २०२३-२४ पासून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.(Comprehensive Crop Insurance Scheme)
त्याअनुषंगाने शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे, शेतकऱ्यांनी कोणतीही अतिरिक्त रक्कम नोंदणीसाठी देऊ नये, असे अवाहन कृषि आयुक्त सुनिल चव्हाण (Sunil Chavhan IAS) यांनी केलं आहे.