कर्जत-जामखेड मतदारसंघात राजकीय भूकंप, आमदार राम शिंदे यांच्या पॅनलकडून राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची उमेदवारी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार प्रा राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना जोर का झटका दिला आहे. कर्जत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांना आमदार प्रा राम शिंदे यांनी आपल्या पॅनलमध्ये उमेदवारी देत राजकीय भूकंप घडवून आणला. आमदार राम शिंदे यांच्या या खेळीने राष्ट्रवादीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कर्जत बाजार समिती निवडणूकीसाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. या पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे कर्जत तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तापकीर यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला विशेषता: आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. सहकाराच्या राजकारणात पक्षीय निवडणूक नसते असा दावा तापकीर यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांच्याबरोबरच उध्दव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष बळीराम यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये उमेदवारी केली आहे. कर्जत तालुक्यात महाविकास आघाडीला धक्का देण्यात आमदार प्रा.राम शिंदे यांना यश आले. तापकीर आणि यादव या दोन महत्वाच्या नेत्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आमदार प्रा राम शिंदे यांची राजकीय ताकद वाढली आहे.
कर्जत बाजार समिती निवडणुकीसाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी जाहीर केलेले उमेदवार खालील प्रमाणे
सोसायटी मतदारसंघ – सर्वसाधारण
- मंगेश रावसाहेब जगताप
- अभय पांडुरंग पाटील
- काकासाहेब लक्ष्मण तापकीर
- प्रकाश काकासाहेब शिंदे
- रामदास झुंबर मांडगे
- भरत संभाजी पावणे
- नंदकुमार मारूती नवले
सोसायटी मतदारसंघ – महिला राखीव
- विजया कुंडलिक गांगर्डे
- लीलावती बळवंत जामदार
सोसायटी मतदारसंघ – इतर मागास प्रवर्ग
1) नितीन नीळकंठ पाटील
सोसायटी मतदारसंघ- विमुक्त जाती / भटक्या जमाती
1) लहू रामभाऊ वतारे
ग्रामपंचायत मतदारसंघ – सर्वसाधारण
1) सुरेश माणिक मोढळे 2) बळीराम मारूती यादव
ग्रामपंचायत मतदारसंघ – अनुसूचित जाती जमाती – बाळासाहेब विश्वनाथ लोंढे
ग्रामपंचायत मतदारसंघ- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – संभाजी रोहिदास बोरूडे
व्यापारी मतदारसंघ – अनिल शोभाचंद भंडारी, कल्याण भीमराव काळे
हमाल मापाडी मतदारसंघ – बापूसाहेब प्रभाकर नेटके