जामखेड नगरपरिषद पाणी पुरवठा योजना व मलनि:स्सारण योजनेसह तुकाई उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी आमदार राम शिंदे उतरले मैदानात !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । गेल्या तीन वर्षांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघातील रखडलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार प्रा राम शिंदे हे आता मैदानात उतरले आहेत. जामखेड शहराची पाणी योजना आणि कर्जतमधील तुकाई उपसा सिंचन योजना सह आदी विषयांवर आज 1 डिसेंबर 2022 रोजी मुंबईत मोठ्या घडामोडी घडणार आहेत. आमदार प्रा राम शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळासह वर्षा बंगल्यावर जाणार आहेत. यासंबंधी आमदार शिंदे यांनी फेसबुक पोस्ट लिहली आहे.

MLA Ram Shinde has come to the ground to pave the way for big projects in Karjat-Jamkhed, will meet Chief Minister Eknath Shinde with delegation, MLA Ram Shinde

कर्जत-जामखेड मतदारसंघातील जामखेड शहर पाणी योजना आणि कर्जतमधील तुकाई उपसा सिंचन योजना या महत्वाच्या प्रकल्पांची कामे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून तीन वर्षे महाविकास आघाडी सरकारने बंद ठेवले.जनतेला वेठीस धरले, श्रेयासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून हा उद्योग करण्यात आला,आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता आमदार राम शिंदे यांनी फेसबुक पोस्ट मधून रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान, योजना मंजुर असूनही श्रेयासाठी त्या आडवल्या गेल्या यामुळे जनता त्रस्त झाली आहे. मतदारसंघातील महत्वाच्या योजना मार्गी लावण्यासाठी आमदार राम शिंदे हे आता मैदानात उतरले आहेत. आज दुपारी 1 वाजता आमदार राम शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी कर्जत-जामखेडच्या शिष्टमंडळासह भेट घेणार आहेत.आमदार राम शिंदे हे ॲक्शन मोडवर आल्याने कर्जत-जामखेडमधील रखडलेल्या महत्वाच्या योजना मार्गी लागण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आमदार प्रा राम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, जामखेड नगरपारिषदेने १३/०७/२०१८ रोजी सर्वसाधारण सभेचा ठराव क्र. ११ / ४ अन्वये उजनी धरणावरून उद्भव निश्चित करून योजनेची अंदाजपत्रकीय तांत्रिक तपासणी पोटी रक्कम रु. १,२३,१९,५१४/- इतके म. जी. प्रा. विभाग अहमदनगर या कार्यालयात डी. आर. नं. ५६३१ दि. ११/७/२०१८ रोजी भरणा करण्यात आलेली आहे. यानंतर तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देवून तत्वतः शासनाने 23 ऑगस्ट २०१९ मध्ये मान्यता दिलेली होती.

दरम्यान २०१९ ला राज्यामध्ये सत्तातंर होवून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून गेल्या तीन वर्षांपासून हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे जामखेड शहर व उपनगर जनतेची पाण्यावाचून मोठया प्रमाणात कुचंबना झाली. सध्या जामखेड शहराला ८ ते १० दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातो. पूर्वीची १९७४ ची पाणी योजना कालबाह्य झालेली असून राजकीय द्वेषापोटी श्रेयवादाच्या कारणामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून महाविकास आघाडी सरकारने पाण्यावाचून जनतेस वेठीस धरण्याचे काम केले असा गंभीर आरोप शिंदे यांनी या पत्रातून रोहित पवारांवर केला आहे.

जनतेच्या हितासाठी नगरविकास विभागाने पाणी प्रश्नांवर तोडगा काढून जामखेड पाणीपुरवठा योजना व मलनि:स्सारण योजनांना तातडीेने मंजुरी द्यावी तसेच निधी उपलब्ध करून द्यावा आणि हे काम सुरु करण्याचे निर्देश द्यावेत आणि जनतेवरील अन्याय दूर करावा, अशी विनंती आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

दरम्यान, आमदार राम शिंदे यांनी तुकाई उपसा सिंचन योजनेबाबतही एक पत्र फेसबुकवर पोस्ट केले आहे, त्यात म्हटले आहे की, तुकाई उपसा सिंचन योजना गेल्या तीन वर्षांपासून बंद असून ती तातडीने पूर्ण करणे गरजेची आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपल्या दालनात बैठक बोलवावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे की,  तुकाई उपसा सिंचन योजनेचे कार्यारंभ आदेश दि. ०२/०३/२०१९ रोजी देण्यात आले होते. ३० टक्के काम पूर्ण केलेले असून उर्वरित काम गेले तीन वर्षापासून बंद आहे. सदर योजनेमध्ये २६ पाझर तलांव, २२ गावे यांना शेतीला, जनावरांना व पिण्यासाठी पाण्याचा उपयोग होणार होता.

तथापि सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून गेली तीन वर्षे हे काम जाणीवपूर्वक श्रेयवादामुळे थांबविण्यात आलेले आहे. त्यामुळे २२ गावातील शेतक-यांना जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम आमदार रोहित पवारांनी केले आहे.

या कामावरती तीन वर्षापासून जाणीवपूर्वक ठेकेदाराचे बील काम होवून देखील आदा करण्यात आलेले नाही. मा. मुख्यमंत्री महोदय तुकाई उपसा सिंचन योजना, ता. कर्जत, जि. अहमदनगर बाबत आपल्या दालनामध्ये योजना सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून लवकरात लवकर बैठक बोलविण्यात यावी व आमच्या शेतक-यांना, जनतेला न्याय देण्यात यावा, अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी केली आहे.