मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवतेंच्या बदलीचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात, आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळ गुरूवारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला – भाजप शहराध्यक्ष बिभीषण धनवडे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या मनमानी कारभाराविरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे.भाजपने दंडवते यांच्याविरोधात 14 गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांच्या चौकशीसाठी दंडवते यांची तडकाफडकी बदली करावी,अशी मागणी जामखेड शहर भाजपने तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली होती. ही मागणी करून काही तास उलटत नाही तोच आता भाजपच्या गोटातून आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे.

The issue of transfer of Chief Minister Mininath Dandawat is directly in the court of Chief Minister, BJP delegation led by MLA Ram Shinde will meet the Chief Minister tomorrow - BJP City President Bibhishan Dhanwade

मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या बदलीसाठी आक्रमक झालेल्या जामखेड शहर भाजपने थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारातच मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांचा फैसला करण्याचा निर्णय घेतला आहे. जामखेड शहर भाजपच्या शंभर पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ शहराध्यक्ष बिभीषण धनवडे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी मुंबईत धडकणार आहे. दंडवते यांच्या बदलीसाठी हे शिष्टमंडळ आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या कारभाराविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. दंडवते यांची बदली करावी आणि त्यानंतर दंडवते यांच्या आजवरच्या कारभाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी जामखेड भाजपची आहे. गुरूवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर काय खलबते होणार ?  याकडे आता जामखेड शहराचे लक्ष लागले आहे.

जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या बदलीसाठी आक्रमक झालेल्या जामखेड शहर भाजपने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या गुरूवारी दुपारी जामखेड शहर भाजपच्या 100 पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, या भेटीत मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या तडकाफडकी बदलीची मागणी करण्याबरोबरच त्यांच्या कारभाराची सखोल चौकशीची मागणी करणार आहोत, अशी माहिती भाजपचे जामखेड शहराध्यक्ष बिभीषण धनवडे यांनी बुधवारी रात्री जामखेड टाइम्सशी बोलताना दिली.

दरम्यान, जामखेड शहर भाजपचे शिष्टमंडळ शहराध्यक्ष बिभीषण धनवडे यांच्या नेतृत्वाखाली पहाटे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. गुरूवारी दुपारी हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.

मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्याविरोधातील भाजपचे 14 आरोप खालील प्रमाणे

1. प्रशासक काळातील सर्व खर्चाची व अदा केलेल्या सर्व बिलांची सखोल चौकशी करण्यात यावी.

2. जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुक प्रक्रिया गुप्त असताना राजकीय दबावाखाली प्रभाग रचना व मतदारयाद्या चुकीच्या पद्धतीने केल्या.

3. मागील दोन वर्षापासुन दैनंदिन व आठवडे बाजार व्यावसाय कर लिलाव प्रक्रिया झालेली नसून त्याची वसूली मात्र सक्तीने चालू असून त्यामध्ये गैरव्यवहा चालु आहे.

4. जिओ कंपनीच्या शहरात विना परवाना बसवन्यात आलेल्या पोलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केला

5. नगर परिषद अंतर्गत कामामध्ये व टेंडर पद्धती मध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे.

6. जागेच्या व घरांच्या नोंदीमध्ये फेरफार करून आर्थिक गैरव्यवहार चालु आहे. 7. सार्वजनिक शौचालय दुरुस्ती प्रक्रिया मध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे..

8. मोकाट वराह पकडन्याच्या निविदा प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे.

9. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्ये जातीय तनाव निर्माण करण्याच काम केल आहे. आनाधिकृत बांधकामांना शास्ती कर न आकारता नोदी लावल्या आहेत.

11. कर्मचारी वर्गावर दबाव टाकुन चुकीचे कामे करून घेण्यात येतात, ज्या कर्मच्यार्यानी चुकेचे कामे केले नाही त्यांना निलंबीत केले आहे.

12. नागरिकांना भेटीसाठी वेळ देऊन भेटत नाहीत व व्यक्ती पाहून काम करतात.

13. लॉकडाउन नियमांचा गैरफायदा घेत मुख्य अधिकारी यांनी कर्मचार्यान मार्फत व्यापार्याना जाणीव पूर्वक त्रास देऊन चुकीच्या पद्धतीने आर्थीक वसूली केली.

14. डी.पी.प्लॅन ( शहर विकास आराखडा) मध्ये सर्वेअर यांना हाताशी धरून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केलाआहे, त्यामुळे जामखेड नगरपरिषदेचा डी.पी प्लॅन वदाच्या भोवर्‍यात सापडला आहे.