मोठी बातमी : जामखेडकरांना आमदार राम शिंदेंचे मोठे गिफ्ट, अखेर जामखेड शहर पाणी पुरवठा योजना मंजुर, जामखेडकरांमध्ये आनंदाचे वातावरण!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । गेल्या तीन वर्षांपासून जामखेड शहर पाणी पुरवठा योजना आणि मलनि:स्सारण योजनांच्या फायली शासन दरबारी अडकल्या होत्या, या योजना मंजुर व्हाव्यात यासाठी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जामखेड शहर भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी आज 1 रोजी भेट घेतली. जामखेड शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आमदार राम शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला.आमदार राम शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जामखेडकरांंना खर्‍या अर्थाने मोठे गिफ्ट मिळाले आहे.

Big news, MLA Ram Shinde's big gift to Jamkhedkars, finally Jamkhed city water supply scheme approved, atmosphere of happiness among Jamkhedkars,

50 हजार लोकसंख्या असलेल्या जामखेड शहरासाठी सध्या 1974ची पाणी योजना आहे. ती कालबाह्य झाली आहे. त्यामुळे आमदार राम शिंदे हे फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी जामखेड शहरासाठी उजनीहून जामखेडसाठी पाणी आणण्याची योजना आखली होती. या योजनेला 23 ऑगस्ट 2019 रोजी सरकारने तत्वता: मंजुरी दिली होती. परंतू विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा रोहित पवारांकडून पराभव झाला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारच्या काळात ही योजना मार्गी लावण्यात आमदार रोहित पवारांना अपयश आले.

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्यात पुन्हा भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता आली. शिवाय राम शिंदे हे विधानपरिषदेवर निवडून आले. आमदार बनले. मंत्री असताना आमदार राम शिंदे यांनी पाणी टंचाईपासून जामखेड शहरवासियांची कायमस्वरूपी सुटका व्हावी यासाठी पाहिलेल्या स्वप्नाची पुर्ती करण्याची त्यांना पुन्हा संधी आली. त्यानुसार आमदार राम शिंदे यांनी जामखेड शहर पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावायचाच यासाठी पुन्हा मैदानात उडी घेतली.

भाजपचे जामखेड शहराध्यक्ष बिभीषण धनवडे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड भाजपच्या 100 पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज 1 डिसेंबर रोजी मुंबई गाठली. जामखेड शहर पाणी पुरवठा आणि मलनि:स्सारण योजना मार्गी लावण्यासाठी या शिष्टमंडळाने आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. जामखेडकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी फायली मागवून घेत दोन्ही योजनांना मंजुरी दिली.

आमदार राम शिंदे यांचे राज्याच्या राजकारणात असलेले महत्व आणि राजकीय वजन याची पुन्हा एकदा सर्वांनाच प्रचिती आली. जामखेड शहर पाणी पुरवठा योजना आणि मलनि:स्सारण योजना मंजुर करून घेण्यात आमदार राम शिंदे यशस्वी ठरले. यामुळे जामखेड शहरवासियांना गेल्या अनेक वर्षांचा जिव्हाळ्याचा प्रश्न निकाली निघाला यामुळे जामखेडकरांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. शिंदे यांनी महत्वाचा प्रश्न लावल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी 250 कोटींचा निधी मंजुर

दरम्यान, आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे 180 कोटींची जामखेड पाणी पुरवठा योजना व मलनि:स्सारण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मंजुर केली. तसेच कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेलाही मंजुरी दिली. यासाठी 70 कोटींचा निधी मंजुर केला. कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी 250 कोटींचा निधी मंजूर केल्याबद्द आमदार प्रा राम शिंदे आणि कर्जत- जामखेड मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत त्यांचा भव्य हार घालून सत्कार केला.

स्थानिक नागरिकांना पाण्याचा लाभ मिळवून देणे हे आपले कर्तव्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील तुकाई उपसा सिंचन योजना तसेच जामखेड पाणीपुरवठा योजना आणि मलनिस्सारण योजना काही कारणामुळे रखडली असली तरी, पाणी ही माणसाची मूलभूत गरज असून ती देऊन स्थानिक नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. या कर्तव्यभावनेतूनच 180 कोटींची जामखेड पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण योजना मंजूर केली. राज्यातील युती सरकारचा गतिमान कारभार कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिकांना नक्की कळेल अशी भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

रोहित पवारांनी जामखेडकरांना पाण्यापासून वंचित ठेवलेआमदार राम शिंदेंचा हल्लाबोल

दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघात तुकाई उपसा सिंचन योजना आणि जामखेड शहर पाणी पुरवठा योजना आणि मलनि:स्सारण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तात्काळ मार्गी लावल्याबद्दल आमदार प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच यावेळी पुढे बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, फडणवीस सरकार असताना जामखेड शहर पाणी पुरवठा योजनेला तत्वता: मंजुरी दिली होती. ज्यावेळेस महाराष्ट्र सरकार तत्वता: मंजुरी देतं, त्याच्यानंतर योजना मंजुरीसाठी तीन वर्षे लागतात, ही त्रुटी कश्यासाठी, शेवटी विद्यमान सदस्य हे पवार कुटुंबातील होते, त्यांचं राज्यामध्ये सरकार होतं,आणि त्यांच्या फाईल कोण आडवतं होतं ? त्यांची फाईल का मंजुर झाली नव्हती ? फक्त राम शिंदेंनी सुरूवात केलेल्या कामाचं शिंदेंना श्रेय जाऊ नये म्हणुन जाणीवपूर्वक हे काम बंद करण्याचं काम रोहित पवारांनी केलं होतं असा हल्लाबोल आमदार राम शिंदे यांनी केला आहे.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, रविंद्र सुरवसे,जामखेड भाजपचे शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले , सोमनाथ पाचरणे अशोक खेडकर,नगरसेवक अमित चिंतामणी, राजेंद्र देशपांडे, मनोज कुलकर्णी, सोमनाथ राळेभात, डाॅ ज्ञानेश्वर झेंडे, संदीप गायकवाड गणेश आजबे  शाकीर खान,संतोष गव्हाळे, अण्णा ढवळे,ॲड प्रवीण सानप , प्रवीण बोलभट, तात्याराम पोकळे, डाॅ अल्ताफ शेख, मोहन मामा गडदे, मोहन देवकाते ,गोरख धनवट श्रीराम डोके महेश मासाळ नितीन धनवटे, ऋषिकेश मोरे, सुनील यादव, विक्रांत घायतडक, तुषार बोथरा, बाळासाहेब गायकवाड विठ्ठल राळेभात, सलीम तांबोळी, राहुल राऊत, शिवकुमार डोंगरे, संतोष राळेभात, आबु पवार, संजय वाघमोडे, प्रसिद्धीप्रमुख उद्धव हुलगुंडे, बाबासाहेब फुलमाळी सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.