maharashtra krushi din 2023 : स्व.वसंतराव नाईक यांनी राज्याला दिशा देण्याचं काम केलं – कृषि आयुक्त सुनिल चव्हाण

पुणे, 1 जूलै 2023 : maharashtra krushi din 2023 :  शेतकरी कुटुंबातून आलेल्या स्व.वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी शेती, औष्णिक वीज निर्मिती, ग्राम विकास, पंचायतराज, रोजगार हमी योजना, जलसंधारण अशा विविध कार्याच्या माध्यमातून राज्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला. कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यांच्या जयंती निमित्ताने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कृषि विभागाने केला आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांनी केले.

maharashtra krushi din 2023, Mr. Vasantrao Naik worked to give direction to state - Agriculture Commissioner Sunil Chavan

स्व.वसंतराव नाईक जयंतीनिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्या श्री. शरदचंद्र पवार सभागृहात राज्यस्तरीय कृषि दिन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी कृषि आयुक्त सुनिल चव्हाण बोलत होते. यावेळी राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कृषि संचालक कैलास मोते, विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, विभागीय कृषि सहसंचालक रफिक नाईकवाडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, कृषि विकास अधिकारी अशोक पवार आदी उपस्थित होते.

maharashtra krushi din 2023, Mr. Vasantrao Naik worked to give direction to state - Agriculture Commissioner Sunil Chavan

यावेळी राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. टमाटा आणि सोयाबीन पिकांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन असलेल्या घाडीपत्रिकेचे मंत्री महोदयांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृत्य व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेत राज्यातर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याने केंद्र आणि राज्याचे मिळून आता शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत.

maharashtra krushi din 2023, Mr. Vasantrao Naik worked to give direction to state - Agriculture Commissioner Sunil Chavan

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ १ रुपये भरुन पीक विम्याचा लाभ घेता येणार आहे.

शेतकरी आणि त्याच्या कुटुंबतील सदस्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत २ लाखापर्यंत मदत देण्यात येणार आहे.

कृषि यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, प्रक्रिया उद्योगावरही भर देण्यात येत आहे.