Buldhana Bus Accident Live Updates : मुलाला शिक्षणासाठी नागपुरला सोडायला गेलेल्या गंगावणे कुटूंबावर काळाचा घाला, बुलढाणा बस अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

बुलढाणा, 1 जूलै 2023  : Buldhana Bus Accident Live Updates : बुलढाणा जिल्ह्यात समृध्दी महामार्गावरील बस जळीत अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यातील तिघांची ओळख पटली आहे. मुलाला नागपुरच्या विधी महाविद्यालयात शिक्षणासाठी सोडून पुण्याकडे परतणाऱ्या एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

Buldhana bus accident Live Updates, Gangavane family who left their child in Nagpur for education three died in Buldhana Bus accident, Kailas Gangawane, Kanchan Gangawane, Sai Gangawane news,Ambegaon,

पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील गंगावणे कुटुंबीयांच्या मृत्यूमुळे आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात शोककळा पसरली आहे. कैलास गंगावणे, कांचन गंगावणे आणि सई गंगावणे अशी मयत गंगावणे कुटुंबीयांची नावे आहेत. गंगावणे यांच्या मुलाला नागपूरला महविद्यालयीन शिक्षणासाठी सोडून पुण्याला परत येत असतानाच हा अपघात घडला. पहाटे कुटुंबीयांच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

गंगावणे कुटुंब नागपूरहून पुण्याला परतत होते

मूळचे शिरुर येथील असलेले गंगावणे कुटुंब नोकरीच्या निमित्ताने आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे राहत होते. पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात कैलास गंगावणे हे गेली 27 वर्षे प्राध्यापक म्हणून काम करत होते. गंगावणे यांची मुलगी सई हिने गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला होता, ती वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी होती. तर मुलाला नागपूर येथील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता.

आई-वडिल आणि मुलगी मुलाला नागपूर येथे सोडण्यासाठी गेले होते. मुलाला सोडून ते विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसने पुण्याला परत येत होते. मात्र वाटेतच समृद्धी महामार्गावर त्यांचा दुर्दैवी अंत झाला. गंगावणे यांचा मेव्हणा अमर काळे बहिण, भावोजी आणि भाचीला फोन लावत होते, मात्र तिघांचाही फोन लागत नव्हता. यानंतर बसच्या अपघाताची माहिती मिळाली.

मेव्हण्याने तिघांचा शोध घेतला असता घटना उघड

बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अमर काळे यांनी बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून तातडीने माहिती घेतली. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव होते. तसेच त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघातस्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षापर्यंत पोलीस आले. अपघाताच्या बातमीने निरगुडसर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. विद्यालयात शोकसंदेश व्यक्त करुन विद्यालयास सुट्टी देण्यात आली आहे.

वाहनांची मदत मागितली. मात्र कोणीही थांबले नाही.

योगेश रामदास गवई हा तरूण या भीषण दुर्घटनेतून बचावला आहे. या घटनेबाबत माहिती देताना तो म्हणाला की, मी नागपूरहून औरंगाबादसाठी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये चढलो. समृद्धी महामार्ग एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्यानंतर बस पलटी होऊन लगेचच पेटली. 3-4 जण खिडकी तोडून पळून गेले, काही वेळातच बसमध्ये स्फोट झाला. यावेळी मी एका मुलाल वर खेचले. तो वाचला. आम्ही खाली उडी मारताच ट्रॅव्हल्सचा स्फोट झाला. यावेळी आम्ही तेथून दूर पळालो.”

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने सांगितले की, “माझ्या शेजारी बसलेला प्रवासी आणि मी मागील खिडकी तोडून बाहेर आलो. बसची खिडकी तोडून चार ते पाच प्रवासी बाहेर आले, मात्र इतर प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. एका स्थानिक नागरिकाने सांगितले. “अपघातानंतर लोकांनी महामार्गावरील इतर वाहनांची मदत मागितली. मात्र कोणीही थांबले नाही.”

नेमकी घटना काय ?

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पिपळखूटा शिवारात आज पहाटे 2 वाजेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला.या अपघातात बस जळून खाक झाली. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेत २६ जीवंत माणसं जळून खाक झाली. या दुर्दैवी भीषण घटनेमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. (Buldhana Bus Fir)

यवतमाळ येथील विदर्भ ट्रॅव्हल्सची बस क्र.MH29 BE1819 ही यवतमाळ येथून पुण्याकडे जात होती. समृद्धी महामार्गाच्या चॅनेल क्र.३३२ जवळ रात्री १.३० ते २ वाजण्याच्या दरम्यान बस चालकाचे नियंत्रण सुटून ही बस दुभाजकाला धडकून उलटली. यानंतर लगेच बसने पेट घेतला.

यावेळी पाच प्रवाशी व ट्रॅव्हल्सचे तीन कर्मचारी असे आठजण तात्‍काळ बसमधून बाहेर पडले. अन्य २६ प्रवाशी रात्रीच्या गाढ झोपेत असल्याने व बसने मोठा पेट घेतल्याने २६ प्रवाशांचा जळून घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघाताची बातमी कळल्यानंतर पोलीस, अग्नीशमन दल आदी यंत्रणा मदतीसाठी धावल्या. परंतू बसमध्ये आगीने रौद्र रूप धारण केल्‍याने सर्व हतबल झाले. ते बसमधील प्रवाशांना वाचवू शकले नाहीत. आगीत होरपळलेल्या प्रवाशांचा आकांत ह्रदयाला पिळवटून टाकणारा होता. आरोग्य विभाग व पोलीसांनी सर्व मृतदेह बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवागारात हलवले आहेत.

या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या आठ जणांवर देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मृतांची नावे मिळवण्याचे व ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. मृतांच्या नातेवाईकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात मोबाईल क्र.7020435954 आणि 07262242683 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अपघातातील जखमी व्यक्तींची नावे (चालक)-शे.दानीश शे.ईस्माईल या.दाव्हा जि.यवतमाळ, (क्लिनर) संदीप मारोती राठोड (३१) रा तिवसा, योगेश रामराव गवई रा.औरंगाबाद., साईनाथ चरमसिंग पवार (१९) रा माहूर, शशिकांत रामकृष्ण गजभिये या.पांढरकवडा, पंकज रमेशचंद्र रा.कांगडा (हिमाचल प्रदेश) या अपघातातील बसचा चालक व क्लिनर या दोघांना सिंदखेडराजा पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

नागपुरच्या पाच मृतांची ओळख पटली

बुलढाणा बस अपघातातील मृतांमध्ये नागपुरच्या पाच मृतांची ओळख पटली आहे. यामध्ये आयुष गाडगे, कौस्तूभ काळे, इशांत गुप्ता, गुडीया शेख, योगेश गवई यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बुकिंग कार्यालयातून पोलीस प्रवाशांची माहिती घेत आहे. इतर मृतांची ओळख पटवण्याचे कामे सुरु आहे.

बुलढाणा अपघात, बुलढाणा बस अपघात, बुलढाणा बस अपघात लाईव्ह, बुलढाणा लाईव्ह, बुलढाणा बस अपघात बातमी, बुलढाणा बस अपघात बातम्या, समृध्दी महामार्ग अपघात, समृध्दी महामार्ग अपघात बुलढाणा, बुलढाणा समृध्दी महामार्ग अपघात, buldhana bus accident, buldhana bus accident death list, buldhana bus accident news, buldhana bus accident latest news, buldhana bus accident latest update,  buldhana bus accident live update,  buldhana bus accident marathi news, buldhana bus accident fir, buldhana bus fir today, bus accident, bus accident in maharashtra, bus accident news, bus accident  latest news, bus accident latest update,  bus accident  live update, buldhana bus accident,  bus accident today, bus accident on Samrudhi,  bus accident in samruddhi mahamarg, bus accident news today, buldhana bus accident  live updates,