पत्रकार सुभाष माळवे यांना स्व मोहनलाल बियाणी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कर्जतचे जेष्ठ पत्रकार सुभाष माळवे यांना स्व मोहनलाल बियाणी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व मराठवाडा साथीच्या वतीने देण्यात येणाऱ्या सकारात्मक लेखन या विषयावर देण्यात येणार आहे.सदर पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

सुभाष माळवे यांना पुरस्कार जाहिर होताच आरपीआयचे उत्तर महाराष्ट्रचे उपाध्यक्ष प्रा शशिकांत पाटील यांनी सोमवारी त्यांचा सत्कार केला. यावेळी कर्जत तालुका पत्रकारसंघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे, मुन्ना पठाण, आशिष बोरा, डॉ अफरोजखान पठाण, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ दयानंद पवार, लखन भैलुमे, अंकुश भोज आदी उपस्थित होते.

माळवे यांचे कर्जतच्या पत्रकारी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या पुरस्काराचे सर्वत्र स्वागत होत आहे. यासह कर्जत तालुका पत्रकारसंघाच्या वतीने देखील माळवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नुतन अध्यक्ष मच्छीन्द्र अनारसे, सचिव डॉ अफरोजखान पठाण, उपाध्यक्ष निलेश दिवटे, खजिनदार मुन्ना पठाण, सल्लागार गणेश जेवरे, मोतीराम शिंदे आदी उपस्थित होते.