कर्जत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मच्छीन्द्र अनारसे तर सचिवपदी डॉ अफरोजखान पठाण यांची निवड

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कर्जत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मच्छीन्द्र अनारसे यांची तर सचिवपदी डॉ अफरोजखान पठाण यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. मावळते अध्यक्ष मोतीराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. (Machhindra Anarse elected as President of Karjat Taluka Press Association and Dr. Afroz Khan Pathan elected as Secretary)

कर्जत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे मच्छीन्द्र अनारसे यांची तर सचिवपदी जामखेड टाइम्सचे कर्जत तालुका प्रतिनिधी डॉ अफरोजखान पठाण यांची निवड मावळते अध्यक्ष मोतीराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कर्जत तालुका पत्रकार संघाची नुतन कार्यकारिणी

अध्यक्ष – मच्छीन्द्र अनारसे, सचिव – डॉ अफरोजखान पठाण, उपाध्यक्ष – निलेश दिवटे, खजिनदार – मुन्ना पठाण, सल्लागार – गणेश जेवरे, सुभाष माळवे, मोतीराम शिंदे, सदस्य – दिलीप अनारसे, आण्णा बागल.

यावेळी नुतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना नुतन अध्यक्ष अनारसे यांनी कर्जत तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या हक्कासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी अहमदनगर पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे, सुधीर मेहता, प्रा दिनेश रोडे, अशोक तुपे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली