Maharashtra Omicron Corona Updates | राज्यात दिवसभरात आढळले 1426 नवे रूग्ण तर 21 मृत्यू : राज्यात ओमिक्रॉनचा उद्रेक सुरूच

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Maharashtra Omicron Corona Updates । राज्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. सोमवारी 27 डिसेंबर रोजी दिवसभरात 1426 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 21 कोरोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोच देशासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. जगभर धुमाकुळ घालणारा ओमिक्रॉन भारतातही हातपाय पसरू लागला आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या रूग्णांमुळे देशातील अनेक राज्यात निर्बंध लावले आहेत.

महाराष्ट्रात आज दिवसभरात एकुण 1426 नवे कोरोनाबाधित तर ओमिक्रॉनचे 26 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज आढळून आलेल्या नव्या ओमिक्रॉन रुग्णांमध्ये मुंबई 11, पनवेल 05, ठाणे महापालिका 04, नांदेड 02, तर नागपूर, पालघर, भिवंडी निजापुर महापालिका आणि पुणे ग्रामीण मध्ये प्रत्येक एक अश्या 26 रुग्णांचा समावेश आहे. (Maharashtra found 26 Omicron patients today) राज्यातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 167 इतकी झाली आहे.

Maharashtra Omicron Corona Updates

राज्यातील ओमिक्रॉन रूग्ण खालीलप्रमाणे (Maharashtra Omicron Corona Updates)

मुंबई 84, पिंपरी चिंचवड 19,  पुणे ग्रामीण 17,  पुणे आणि ठाणे महापालिका प्रत्येकी 07, नागपुर 03, कल्याण डोंबिवली – अहमदनगर- नांदेड प्रत्येकी 02, बुलढाणा – लातूर – अकोला – वसई – विरार – नवी मुंबई- मिरा भाईंदर- पालघर – भिवंडी निजापुर प्रत्येकी एक असे एकुण 167 ओमिक्रॉन राज्यात आढळून आलेले आहेत. 167 पैकी 72 रूग्णांचे RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

राज्यात सोमवारी 21 कोरोना मृत्यू

राज्यात सक्रीय कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच आज सोमवारी दिवसभरात 21 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यातील मृतांचा आकडा 01 लाख 41 हजार 454 इतका झाला आहे. आज दिवसभरात ठाणे 07, पुणे 13, लातूर 01 असे 21 मृत्यू नोंदवले गेले. तर नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अकोला, नागपूर या मंडळात एकाची मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

राज्यातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या किती?

राज्यात सोमवारी दिवसभरात 1426 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले राज्यात आज अखेर 66 लाख 59 हजार 314 इतक्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झाली आहे. राज्यात सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 10 हजार 441 इतकी झाली आहे. राज्यात दिवसभरात एकुण 776 रूग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोनातून बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या 65 लाख 03 हजार 733 इतकी झाली आहे. राज्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.66 टक्के इतके आहे. राज्यात आज अखेर 91 हजार 464 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर 880 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने जारी केली आहे.