पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रोहित पवार गडचिरोली भागाच्या दौऱ्यावर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात पुराची स्थिती आहे. मुसळधार पावसाचा मोठा फटका गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यांना बसला आहे. या भागातील नद्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत आहे. पुरामुळे शेतीचे, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. (Rohit Pawar visited Sironcha area in flood affected Gadchiroli, provided essential items to the flood victims.)

Rohit Pawar visited Sironcha area in flood affected Gadchiroli, provided essential items to the flood victims.

विदर्भातील पूरग्रस्त भागात मदतकार्य वेगाने राबवले जात आहे. कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. पवार हे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत पवार यांनी महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्याला भेट देत पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. (Rohit Pawar on visit to Gadchiroli area to help flood victims)

Rohit Pawar visited Sironcha area in flood affected Gadchiroli, provided essential items to the flood victims.

रोहित पवार यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, सिरोंचा (जि.गडचिरोली) तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला. अनेक गावांना पाण्याने वेढा दिल्याने नागरीकांचे हाल झाले. या भागातील नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.

Rohit Pawar visited Sironcha area in flood affected Gadchiroli, provided essential items to the flood victims.

यावेळी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि स्थानिक नागरीकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम साहेब, स्थानिक पदाधिकाऱ्यांसह नागपूरहून आलेले पदाधिकारी शैलेंद्र तिवारी, सौरभ मिश्रा, अनिल बोकडे, सुमित बोडखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Rohit Pawar visited Sironcha area in flood affected Gadchiroli, provided essential items to the flood victims.