Jamkhed market committee result : जामखेड बाजार समिती निवडणूक निकाल : सोसायटी मतदारसंघातील 11 जागांचे निकाल जाहीर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड बाजार समितीवर कब्जा कोणाचा याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. या निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार यांच्या गटात थेट सामना रंगला होता. आज या निवडणुकीसाठी आज अतिशय चुरशीच्या वातावरणात विक्रमी मतदान पार पडले. मतदानानंतर सायंकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. सोसायटी मतदारसंघातील सर्व 11 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये आमदार प्रा.राम शिंदे यांच्या गटाला 4 जागा तर आमदार रोहित पवार गटाला 7 जागा मिळाल्या आहेत.

Jamkhed market committee results 2023, results of 11 seats in Jamkhed market committee society constituencies announced

सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण 7 जागांसाठी 15 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपला 3 तर राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या आहेत.अपक्ष उमेदवार विलास जगदाळे यांनी तब्बल 173 मते घेत भाजपच्या उमेदवारांना अडचणीत आणले. जगदाळे हे राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छूक होते. राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. त्यांच्या विजयासाठी अनेक जण मेहनत घेत होते. परंतू त्यांना विजयाचा जादुई आकडा गाठण्यात अपयश आले.

दरम्यान सोसायटी मतदारसंघातील महिला राखीव प्रवर्गातील मतदारसंघात दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले.

जामखेड बाजार समिती सोसायटी मतदारसंघ निकाल

1) सुधीर राळेभात – कपबशी – विजयी
2) कैलास वराट – कपबशी -विजयी
3) अंकुश ढवळे  – कपबशी -विजयी
4) सतिश शिंदे – कपबशी – विजयी
5) गौतम उतेकर – छत्री – विजयी
6) सचिन घुमरे – छत्री – विजयी
7) विष्णू भोंडवे – छत्री – विजयी
8) रतन चव्हाण – कपबशी – विजयी
9) अनिता शिंदे – कपबशी – विजयी
10) डाॅ गणेश जगताप – छत्री – विजयी
11) नारायण जायभाय – कपबशी – विजयी

सोसायटी मतदारसंघातील 11 जागांपैकी 7 जागांवर राष्ट्रवादीने तर 4 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.