Jamkhed Market Committee Result : जामखेड बाजार समिती ग्रामपंचायत मतदारसंघ 4 जागांचे निकाल जाहीर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Jamkhed Market Committee Latest Result : जामखेड बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने सोसायटी मतदारसंघात आघाडी घेतली आहे.त्यांनी 7 जागांवर विजय मिळवला आहे.तर 4 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातील 4 जागांसाठी झालेल्या मतमोजणीचा निकाल आता समोर आला आहे. या निकालात भाजपने सर्व 4 जागांवर बाजी मारत आघाडी घेतली आहे. कर्जतमध्ये निर्माण झालेल्य् परिस्थितीकडे जामखेड बाजार समितीची वाटचाल सुरु झाली की काय अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे.

जामखेड बाजार समिती निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील 11 जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघाची मतमोजणी सुरू करण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण जागेचे निकाल समोर समोर आले आहेत. यात भाजपने बाजी मारली आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ तसेच अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातूनही भाजपनेच बाजी मारली आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातील चार पैकी 4 जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे.

जामखेड बाजार समिती निवडणूक निकाल : सोसायटी मतदारसंघ

1) सुधीर राळेभात – कपबशी – विजयी
2) कैलास वराट – कपबशी -विजयी
3) अंकुश ढवळे  – कपबशी
4) सतिश शिंदे – कपबशी -विजयी
5) गौतम उतेकर – छत्री – विजयी
6) सचिन घुमरे – छत्री – विजयी
7) विष्णू भोंडवे – छत्री – विजयी
8) रतन चव्हाण – कपबशी – विजयी
9) अनिता शिंदे – कपबशी – विजयी
10) डाॅ गणेश जगताप – छत्री – विजयी
11) नारायण जायभाय – कपबशी – विजयी

जामखेड बाजार समिती निवडणूक निकाल : ग्रामपंचायत मतदारसंघ

1) शरद कार्ले  – छत्री  – विजयी
2) वैजीनाथ पाटील – छत्री – विजयी
3) नंदकुमार गोरे – छत्री – विजयी
4)  सिताराम ससाणे – छत्री – विजयी

सोसायटी मतदारसंघातील 11 आणि ग्रामपंचायत मतदारसंघातील 4 अश्या 15 जागांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजपने 8 तर राष्ट्रवादी 7 जागांवर विजय मिळवला आहे. ग्रामपंचायत मतदारसंघाने भाजपला मोठी साथ दिली. आता व्यापारी आणि हमाल मतदारसंघाचा निकाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्जतकरांनी दिलेल्या समसमान कौलाची पुनरावृत्ती होणार की बहुमताचा जादुई आकडा गाठला जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.