Jamkhed market committee results 2023 : जामखेड बाजार समिती निवडणूक निकाल सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण 7 जागांचे निकाल जाहीर

Jamkhed market committee results 2023 : जामखेड टाइम्स वृत्तसेवा । संपुर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या जामखेड बाजार समिती निवडणुकीत चुरशीच्या वातावरणात 98.34 टक्के मतदान झाले होते. मतदानानंतर लगेचच मतमोजणी सुरु करण्यात आली. जामखेड येथील आदित्य मंगल कार्यालयात पार पडत असलेल्या मतमोजणीत सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण 7 जागांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीला 4 तर भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. अजून मतमोजणी सुरू आहे.

Jamkhed market Committee Election Results Society Constituency General 7 Seats Results Announced

जामखेड बाजार समिती निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार यांच्या प्रतिष्ठेला पणाला लागल्या होत्या. या निवडणुकीचा पहिला कल समोर आला आहे. यात आमदार शिंदे गटाला 3 तर आमदार पवार गटाला 4 जागा मिळाल्या आहेत. शिंदे गटाकडून गौतम उत्तेकर, सचिन घुमरे आणि विष्णू भोंडवे हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर पवार गटाकडून सुधीर राळेभात, अंकुश ढवळे, कैलास वराट, सतिश शिंदे हे चार उमेदवार विजयी झाले आहेत.

Jamkhed market Committee Election Results Society Constituency General 7 Seats Results Announced