Karjat Market Committee Result :  कर्जतकरांचा समसमान कौल, आमदार प्रा.राम शिंदे यांच्या गटाला 9 तर रोहित पवार गटाला 9 जागा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत बाजार समिती निवडणूकीत सर्व 18 जागांचे निकाल हाती आले आहेत. या निकालात कर्जतकरांनी दोन्ही आमदारांवर विश्वास दाखवत समसमान कौल दिला. या निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे गटाला 9 तर आमदार रोहित पवार गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे क्राॅस वोटिंगचा मोठा फटका बसला.यामुळे हा पॅनल बहुमतापासून दुर राहिला.

Karjat Market Committee Result, equal number of Karjatkars, 9 seats for MLA Prof. Ram Shinde's group and 9 seats for Rohit Pawar's group

कर्जत बाजार समिती निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. या निवडणुकीत आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठीशी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, भाजप नेते प्रविण घुले, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष बळीराम यादव सह आदी नेते एकवटले होते. या सर्वांनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून मोठी आघाडी घेतली होती. या निवडणुकीत क्राॅस वोटींगचा मोठा फटका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला बसला. 

आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलने सोसायटी मतदारसंघातील सर्वाधिक 7 जागांवर विजय मिळवला. आमदार रोहित पवार यांच्या पॅनलला ग्रामपंचायत मतदारसंघाने साथ दिली. दोन्ही आमदारांना कर्जतकरांनी समसमान साथ दिल्यामुळे आता बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी वेगाने घडामोडी घडताना दिसणार आहेत.

कर्जत बाजार समिती निवडणूक निकाल  : ग्रामपंचायत मतदारसंघ – सर्वसाधारण

1) कानगुडे राम प्रभाकर – कपबशी –  463 – विजयी
2) यादव बळीराम मारूती – छत्री – 376 – विजयी

ग्रामपंचायत मतदारसंघ  – अनुसूचित जाती / जमाती

कांबळे वसंत विठ्ठल- कपबशी – 435 – विजयी

ग्रामपंचायत मतदारसंघ – आर्थिक दुर्बल घटक

पाटील अमोल शिवाजी – कपबशी – 434 – विजयी

व्यापारी मतदारसंघ विजयी उमेदवार

1) नेवसे प्रफुल्ल पंढरीनाथ  – कपबशी – 315 – विजयी
2) भंडारी विजय चंपालाल – कपबशी – 215 – विजयी

हमाल / मापाडी मतदारसंघ

1) नेटके बापूसाहेब प्रभाकर  – छत्री – 158 विजयी

सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघ विजयी उमेदवार

1) पाटील अभय पांडुरंग- छत्री – 566 – विजयी
2) तापकीर काकासाहेब लक्ष्मण- छत्री – 527 – विजयी
3) जगताप मंगेश रावसाहेब- छत्री – 502 – विजयी
4) पाटील संग्राम रावसाहेब- कपबशी – 460 – विजयी
5) मांडगे रामदास झुंबर- छत्री – 460 – विजयी
6) तनपुरे गुलाबराव रामचंद्र- कपबशी – 459 – विजयी
7) नवले नंदराम मारूती – छत्री – 459 – विजयी

सोसायटी मतदारसंघ- महिला राखीव

1) कळसकर सुवर्णा सतिश – कपबशी – 478 – विजयी
2) गांगर्डे विजया कुंडलिक- छत्री – 515 – विजयी

सोसायटी मतदारसंघ – इतर मागास प्रवर्ग

1) श्रीहर्ष कैलासराव शेवाळे – कपबशी – 495 – विजयी

सोसायटी मतदारसंघ- विमुक्त जाती / भटक्या जमाती

2) वतारे लहू रामभाऊ- छत्री – 486 – विजयी