दिलखुलास’ कार्यक्रमात कर्जतचे कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांची मुलाखत

मुंबई, दि. 12: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने महाडीबीटी मेळावा (MahaDBT Krushi Melava) हा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यात प्रथमच राबविण्यात आला.महाडीबीटी कृषिमेळावा आयोजित करण्याची संकल्पना मांडणारे कर्जत तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के (Karjat Taluka Agriculture Officer Padmanabh Mhaske) दिलखुलास कार्यक्रमात मुलाखत होणार आहे.

Interview with Karjat Agriculture Officer Padmanabh Mhaske in Dilkhulas programme

कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांना राजीव गांधी प्रशासकीय अभियान 2022-2023 अंतर्गत शासकीय कर्मचारी गटातून राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या या प्रवासाबद्दल ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती जाणून घेणार आहोत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, मंगळवार दि. 13 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी घेतली आहे.