Biparjoy Cyclone Update : बिपरजाॅय चक्रीवादळ झाले तीव्र, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक !

पुणे : Biparjoy Cyclone Update : अरबी समुद्रात (Arabian Sea) घोंघावत असलेले बिपरजाॅय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) तीव्र झाले आहे. सौराष्ट्र कच्छ किनारपट्टीसाठी हवामान विभागाने ऑरेंज इशारा (Saurashtra Kutch Coast Orange Alert) दिला आहे. या भागातून 135 ते 150 kmps वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आले. (Biparjoy update) या चक्रीवादळाने परिणाम केरळ, कोकण, मुंबई किनारपट्टीवर दिसू लागेल आहेत. या भागात सरकारने NDRF च्या टीम तैनात केल्या आहे. पुढील काही तासांत बिपरजाॅय चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांना वेग आला आहे. सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Biparjoy Cyclone latest news, Cyclone Biparjai becomes dangerous, Meteorological department issues orange alert, PM Narendra PM Modi chairs meeting to review situation in the wake of Cyclone

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बिपरजाॅय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने आढावा बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा (Amit Shha) यांच्या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होती. या बैठकीत उपाययोजनांची रणनिती ठरविण्यात आली. (PM Narendra Modi chairs meeting to review situation in the wake of Cyclone Biparjoy)

Biparjoy Cyclone latest news, Cyclone Biparjai becomes dangerous, Meteorological department issues orange alert, PM Narendra PM Modi chairs meeting to review situation in the wake of Cyclone
photo credit-twitter

बिपरजाॅय चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीला बसणार आहे. येत्या 15 जून पर्यंत हे चक्रीवादळ अरबी समुद्रात ठाण मांडून असणार आहे.सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या जाखाऊ बंदरापासून 420 किलोमीटर अंतरावर, तर पाकिस्तानच्या कराचीपासून 590 किलोमीटर दक्षिणेला आहे.15 जूनच्या दुपारपर्यंत हे चक्रीवादळ मांडवी – गुजरात, कराची आणि जाखाऊ बंदरापासून पार होण्याची शक्यता आहे.

Biparjoy Cyclone latest news, Cyclone Biparjai becomes dangerous, Meteorological department issues orange alert, PM Narendra PM Modi chairs meeting to review situation in the wake of Cyclone
photo credit- twitter

बिपरजाॅय चक्रीवादळाने रौद्ररूप धारण केल्यामुळे समुद्र खवळलेला आहे. केरळ, मुंबई, गोवा, कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या उंच लाटा उसळताना दिसत आहेत. बिपरजाॅय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी समुद्रात जावू नये,असा इशारा जारी करण्यात आला आहे. बिपरजाॅय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईचा जूहू बीच खाली करण्यात आला आहे. या ठिकणच्या पर्यटकांना हलविण्यात आले.NDRF ची तैनात टीम या ठिकाणी तैनात करण्यात आली. रविवारी गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर लाटांचे रौद्र रूप समोर आले होते. त्याचा भयानक व्हिडीओ आज समोर आला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे.

एकिकडे बिपरजाॅय चक्रीवादळाने सर्वांच्या चिंता वाढवलेल्या असतानाच मान्सूनचा प्रवासावर याचा विपरीत परिणाम होणार तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात असली तरी चिंता करण्याची आवश्यकता नाही, मान्सून लवकरच महाराष्ट्रात पोहचणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

येत्या 48 तासात मुंबई सह आदी भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. काल मान्सूनने दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापला होता. बंगालच्या उपसागरात मान्सूनची दुसरी शाखा सक्रीय झाली आहे. बिहारमार्गे उत्तर भारतात मान्सून दाखल होईल. त्यामुळे राज्यातील पुढील पाच दिवसांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नाशिक, रायगड, रत्नागिरी, पालघर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अहमदनगर, सोलापुर सांगली, कोल्हापूर सह राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.