Nasha mukt Bharat Abhiyan 2023 : अहमदनगर जिल्ह्यात नशामुक्ती भारत पंधरवड्याचे आयोजन, अहमदनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये होणार जनजागृती !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking : आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त 12 ते 26 जूनपर्यंत नशामुक्ती भारत पंधरवडा (Drug Free India Fortnight) जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्रांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अहमदनगर जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी दिली.
सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे (Sumanta Bhange, Secretary, Department of Social Justice maharashtra) यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेत आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त आयोजित नशामुक्ती भारत पंधरवडा (Nasha mukti Bharat Abhiyan 2023) राबवण्यासंदर्भात व्यापक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भारत सरकारने (Governor of India) अंमली पदार्थाच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग्स मुक्त ‘भारत’ चा (Drug free India) संकल्प केला आहे. त्याअनुषंगाने ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau -NCB ) 12 ते 26 जून या कालावधीत ‘नशामुक्त भारत पंधरवडा’ (Nasha mukt Bharat Abhiyan 2023) जाहीर करून त्याबाबत सर्व राज्यांना अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत व धोक्यांविरुद्ध लढण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा ‘नशामुक्त भारत’ पंधरवडा कार्यक्रमाचा उद्देश आहे. 26 जून – आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन याचे (World Drug day) औचित्य साधत जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा इ-प्रतिज्ञा मोहिमा या कार्यक्रमाच्या माध्यमांतून नशामुक्त भारत अभियान राबवण्यासंदर्भात सूचित केले आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी व समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी नशामुक्त भारत अभियान समिती (Drug Free India Mission Committee) व व्यसनमुक्ती केंद्राच्या सहाय्याने समयबद्ध कार्यक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन व नशामुक्त भारत पंधरवड्याचे (12 ते 26 जून) आयोजन होणार आहे.
त्यानुसार विद्यापीठ, महिला मंडळे, युवक मंडळे, स्थानिक स्वयंसेवी संस्था अनुदानित संस्था, सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च महाविद्यालये, अपंग संस्था, आश्रमशाळा, जिल्हा परिषद पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक कार्यकत्यांच्या सहभागाने जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, इ-प्रतिज्ञा मोहिमांचे आयोजित करण्याचे निर्देश राज्यातील समाज कल्याण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना ऑनलाइन बैठकीद्वारे दिले आहेत.
बैठकीस समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, यांच्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते.
अभियानाबाबत संबंधितांना सूचना
सर्व शाळा व महाविद्यालयांत समान संधी केंद्र सुरू करण्यात आलेले असून या केंद्रांचे अध्यक्ष प्राचार्य आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवल्या जातात. या केंद्रांच्या अध्यक्षांची बैठक घेऊन त्यांना अभियानाबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय नशाबंदी मंडळाच्या संघटकांसोबत जिल्ह्यातील समान संधी केंद्रामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवढे यांनी दिली.