Pune Akashvani: अखेर प्रसार भारतीने पुणे आकाशवाणी केंद्राबाबतचा ‘तो’ निर्णय फिरवला, चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीला मिळाले मोठे यश !

पुणे : पुण्यातील आकाशवाणी केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करुन त्यावरील बातमीपत्रांचे छत्रपती संभाजीनगरला स्थलांतर करण्याचा निर्णय प्रसार भारतीकडून घेण्यात आल्यानंतर पुणेकरांनी याबाबत तीव्र नाराजी दर्शविली होती. परंतू आता प्रसार भारतीने घेतलेला तो निर्णय आता फिरवला आहे.

Finally, Prasar Bharati reversed decision regarding Pune Akashvani Kendra,  mediation of Chandrakant Patil was great success, Anurag Thakur decision,

पुणेकरांच्या भावना विचारात घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून सदर निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती केली होती. पुणेकरांची भावना आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेली विनंती लक्षात घेऊन मंत्री अनुराग ठाकूर यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या पत्राची तात्काळ दाखल घेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागजी ठाकूर यांनी आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली आहे. याबाबत त्यांच्या खात्याकडून एक पत्रक देखील काढण्यात आल आहे.

पुणेकर आणि लोकभावनेचा आदर करुन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागजी ठाकूर यांनी आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली. त्याबद्दल माननीय अनुरागजी ठाकूर यांचे मनापासून आभारी असल्याचं पाटील यांनी ट्विट करून म्हंटल आहे. तसेच  सर्व पुणेकरांचे अभिनंदन! देखील करत आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र यापुढेही कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.