MPSC Result 2023 : राज्य सेवा (मुख्य) परीक्षा अंतिम निकाल जाहीर, कोणी मारली बाजी, पहा टाॅपर्सची यादी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ७ ते ९ मे २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ चा अंतिम निकाल आज (१५ जून) जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Maharashtra State Services (Main) Exam Final Result Declared, Who Scored, Check List of Tappers,  mpsc result 2023, pramod chougule news,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ७ ते ९ मे २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ चा अंतिम निकाल आज (१५ जून) जाहीर झाला आहे. या निकालातून एकूण ४०५ पदांकरीता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

या परीक्षेमध्ये सर्वसाधारण गटातून प्रमोद बाळासाहेब चौगुले महिलांमधून सोनाली अर्जुनराव म्हात्रे तर मागासवर्ग उमेदवारांमधून विशाल महादेव यादव राज्यात प्रथम आले आहेत.

निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका, उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली.